Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: गडचांदुर येथे शेतकऱ्याने केली आत्महत्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गडचांदुर येथे शेतकऱ्याने केली आत्महत्या धनाढ्य भूमाफिया नेत्याच्या धमकीच्या भीतीने आत्महत्या केल्याचा आरोप संतप्त नातेवाईकांनी मृतदेह गडचांद...
गडचांदुर येथे शेतकऱ्याने केली आत्महत्या
धनाढ्य भूमाफिया नेत्याच्या धमकीच्या भीतीने आत्महत्या केल्याचा आरोप
संतप्त नातेवाईकांनी मृतदेह गडचांदूर पोलिस स्टेशनसमोर ठेऊन केले प्रदर्शन
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदुर -
एकीकडे शेतकरी सतत होणाऱ्या नापिकी ने कर्जबाजारी होत आहे, तर दुसरीकडे अतिवृष्टीने शेती व्यवसाय धोक्यात आल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहे. परंतु गडचांदुर येथील एक शेतकऱ्याने गडचांदुर येथील धनाढ्य भूमाफिया छुटभैय्या नेत्यांसोबत शेत विक्री व्यवहारात अडकून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
औद्यगिकीकरणाने गडचांदूर परिसरातील शेतजमिनीने भाव नवीन उच्चांक गाठले आहे. शेत जमीनीचा व्यवहार एका शेतकऱ्याच्या जीवावर उठल्याची घटना दि. ११ सप्टेंबरला गडचांदूर येथे घडली. येथील विलास वासुदेव मांडवकर यांनी ११ सप्टेंबरच्या पहाटे विषप्राशन केले. त्याना उपचारासाठी चंद्रपूर येथे नेत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. मात्र त्यांच्या जवळ मिळालेल्या सुसाईड नोट मध्ये जमीन व्यवहारातून त्याला शरद जोगी, प्रशांत पाचभाई यांचे कडून मिळालेल्या धमकीमुळे दहशतीत आत्महत्या करीत असल्याचे मृतक विलासने सुसाईट नोट मध्ये उल्लेख केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
विलास वासुदेव मांडवकर वय 50 वर्षे यांनी विष प्राशन करून आत्महत्येनंतर मृतकाच्या संतप्त नातेवाईकांनी मृतदेह गडचांदूर पोलिस स्टेशनसमोर आणून ठेवला. आत्महत्या करण्यापूर्वी पत्रामध्ये ज्या व्यक्तींचा उल्लेख केला होता, त्या दोघांना आत्ताच अटक करा, अन्यथा प्रेत उचलणार नाही असा पावित्रा नातेवाईकांनी घेतला होता. भाजप शहराध्यक्ष सतीश उपलेंचवार, निलेश ताजने, नगरसेवक अरविंद डोहे, शिवसेना गटनेता तथा नगरसेवक सागर ठाकूरवार, काँग्रेसचे चुदरी, मृतक विलासचा मुलगा व एका नातेवाईकासोबत ठाणेदार आमले यांनी सविस्तर चर्चा करून पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यावर त्याप्रमाणे कारवाई करण्याचे आश्वासन दिले आणि प्रेत उचलण्यात आले. रात्री उशीरा अंत्यसंस्कार करण्यात आले.
मृतक विलास यांनी मनोज शर्मा नामक इसमासोबत त्याच्या आजीचे नावे असणाऱ्या वडगाव येथील ५ एकर शेतजमिनीचा ६० लाख रुपयात सौदा केला होता. त्याचे सोबत दिनेश सोनी, मनोज शर्मा, बाळू घायवनकर, गजानन गानफाडे, पंकज गंपावार यांनी आमचे आई वडिलांकडून ५ एकरच्या ठिकाणी ११.५ एकर शेताची रजिस्ट्री करून घेतली. दरम्यान प्रशांत पाचभाई यांनी मला कुठंही जाऊ दिले नाही. शरद जोगी आणी प्रशांत पाचभाई यांनी पैशाचे आमिष दाखवून आमच्या कडून काम करून घेत होता असे सुसाईड नोट मध्ये उल्लेख आहे.
वडगाव शेतशिवारात विलास याचे आजीचे नावे ११.५ एकर शेती होती त्याचे पैकी ५ एकर शेती विक्रीचा व्यवहार शरद जोगी यांचे सोबत झाला होता. मात्र ५ एकरच्या ठिकाणी ११.५ एकराची रजिस्ट्री करून घेतले. चेक द्वारे पैसे दिले मात्र दबाव टाकून दिलेले चेक परत मागत होता. आम्ही नाही म्हणालो तरी दबाव टाकून एक चेक परत नेला व दुसरा चेक वाटु न झाल्यामुळे त्याचे पैसे परत दे, नाही तर तुझ्या, बायको मुलांना मारतो अशी धमकी देत होते. त्यामुळंच धमकीला घाबरून माझ्या बाबांनी आत्महत्या केल्याचे मृतक विलासच्या मुलाचे म्हणणे आहे. तर मृतक विलास मांडवकर याचे सुसाईड नोट मध्ये उल्लेख असणारे शरद जोगी हे गडचांदूर नगरपरिषदचे विद्यमान उपनगराध्यक्ष आहे. आता पोलिस मृत शेतकऱ्याच्या परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी काय कार्यवाही करते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
विलासच्या आत्महत्या प्रकरणात निपक्ष चौकशी करून गुन्हेगार कितीही मोठा असला तरी गुन्हा नोंदवून अटक करू आणि त्याचेवर कायदेशीर कारवाही करू
सत्यजित आमले, ठाणेदार, गडचांदूर

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top