Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: चेव्हेनिंग बॉयचा जनविकास सेनेतर्फे सत्कार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चेव्हेनिंग बॉयचा जनविकास सेनेतर्फे सत्कार युवकांनी ध्येयाकडे लक्ष केंद्रित करावे - ॲड. दिपक चटप  डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्र...
चेव्हेनिंग बॉयचा जनविकास सेनेतर्फे सत्कार
युवकांनी ध्येयाकडे लक्ष केंद्रित करावे - ॲड. दिपक चटप 
डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
ब्रिटिश सरकारतर्फे देशातील मोजक्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी देण्यात येणारी चेव्हेनिंग शिष्यवृत्ती कोरपना तालुक्यातील ॲड. दीपक चटप यांनी पटकावली. लवकरच तो कायद्याच्या उच्च शिक्षणाकरिता लंडनला रवाना होणार आहे. त्याच्या यशाचा गौरव करण्याच्या अनुषंगाने जनविकास सेनेतर्फे चंद्रपूरच्या सिव्हिल लाईन मधील यंग रेस्टॉरंटमध्ये आयोजित कार्यक्रमात ॲड. दीपक चटपचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनविकास सेनेचे पप्पू देशमुख, तर प्रमुख अतिथी म्हणून दैनिक सकाळचे जिल्हा प्रतिनिधी प्रमोद काकडे, सामाजिक कार्यकर्ते नितीन बन्सोड, इन्स्पायर इन्स्टिट्यूटचे संस्थापक व संचालक प्रा. विजय बदखल, ईटीव्ही डिजिटलचे अमित वेल्हेकर, सामाजिक कार्यकर्ते अविनाश पोईनकर आदी उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते ॲड. दीपक चटक यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कायद्याचे उच्च शिक्षण घेतल्यानंतर वैयक्तिक प्रगतीसोबतच समाजातील तळागाळातल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी ॲड. चटप यांनी 
विशेष प्रयत्न करण्याची भावना उपस्थित मान्यवरांनी केली. सत्काराला उत्तर देताना ॲड चटप यांनी विद्यार्थ्यांना संघर्षाच्या काळात नकारात्मक गोष्टीकडे दुर्लक्ष करून आपले ध्येय साध्य करण्याकरिता संपूर्ण शक्तीनिशी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी जनविकास सेनेचे घनश्याम येरगुडे, सुभाष पाचभाई, गोपालराव तायडे, इमदाद शेख, देवराव हटवार, सुभाष फुलझले, कविता अवथनकर, करूणा तायडे, अरुणा महातळे, मेघा मगरे, रमा देशमुख, माया बोडे, मेघा दखणे प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन सेजल महाजन, प्रास्ताविक मनीषा बोबडे तर आभार गीतेश शेंडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनविकास सेनेचे आकाश लोडे, किशोर महाजन, निलेश पाझारे, अजित दखणे, प्रफुल बैरम,अमोल घोडमारे, सतिश घोडमारे, धवल माकोडे आदींनी अथक प्रयत्न केले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top