Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: "त्या" भ्रष्टाचाराची चौकशी त्रिसदस्यीय समिती करणार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
"त्या" भ्रष्टाचाराची चौकशी त्रिसदस्यीय समिती करणार दिपक वर्भे यांना जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांचे मिळाले पत्र आश्वासन मिळताच दिपक वर...
"त्या" भ्रष्टाचाराची चौकशी त्रिसदस्यीय समिती करणार
दिपक वर्भे यांना जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांचे मिळाले पत्र
आश्वासन मिळताच दिपक वर्भे यांचे आमरण उपोषण तूर्तास मागे
प्लास्टिक वस्तूचे पिकअप वाहन पकडून व्यापाऱ्याकडून दोन लाख रुपयाची वसुली केल्याचा आरोप........ वाचा सविस्तर काय आहे प्रकार....
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
नगर परिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांनी प्लास्टिकवर दंडांत्मक कार्यवाही केली यात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार करित संबधीत कर्मचाऱ्यांचे निलंबित करुन  कार्यवाही करण्यात यावी अन्यथा १५ सप्टेंबर पासुन चंद्रपुरात आमरण उपोषण करण्यात येईल अशी मागणी करीत जिल्हाधिकाऱ्यांना दिपक वरभे यांनी निवेदन दिले होते. सदर निवेदनाची दखल घेत जिल्हा प्रशासन अधिकारी नगर विकास शाखा जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपुर यांनी त्रिसदस्यीय समिती गठित करुन या प्रकरणाची सविस्तर चौकशी करुन दोषी असल्यास कार्यवाही करण्यात येईल या आशयाचे पत्र प्राप्त झाल्याने १५ सप्टेंबर पासुन होणारे आमरण उपोषण तूर्तास मागे घेण्यात येत असल्याची माहिती दिपक वरभे यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.
दि. २४ ऑगस्ट २०२२ ला दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास मे. झुल्लुरवार कॉम्प्लेक्स येथील भवानी जनरल स्टोअर्स मध्ये प्रतिबंधीत असलेले प्लास्टिक वस्तूने भरलेली पिकअप रिकामी होत असल्याची कुणकुण गडचांदूर नगर परिषदेचे कर्मचारी कपिल नल्लेवार व प्रमोद वाघमारे यांना लागली. त्या ठिकाणी येवुन प्लास्टिक वस्तूने भरलेली पिकअप वाहन पकडले व नंतर गाडी मालकाशी बोलनी करून त्यांच्या कडून दोन लाख रुपयाची वसुली केल्याचा आरोप या दोघांवर लागला. दंडाची पावती क्र ३३३८४ नुसार पन्नास हजार रूपये दंड वसुल केल्याचे दाखविण्यात आले व उर्वरित दिड लाख रुपयाची हेराफेरी झाल्याची चर्चा सुरु झाली. सदर सर्व प्रकार श्रीसंत झुलुरवार व भवानी जनरल स्टोअर्स च्या सिसीटिव्हित रेकॉर्ड झालेले आहेत असा दावा करीत कपिल नल्लेवार व प्रमोद वाघमारे यांची चौकशी करुन तात्काळ याना निलंबित करावे अन्यथा १५ सप्टेंबर पासुन जिल्हाधिकारी कार्यालय समोर अमोरण उपोषण करण्यात येईल अशी मागणी करीत जिल्हाधिकारी याना निवेदन दिले. या निवेदनाची दखल घेत चौकशी करीता त्रिसस्यीय समिती गठित करण्यात आली या समितीत अध्यक्ष, बल्लारपुर नगर परिषदचे मुख्याधिकारी विशाल वाघ, सदस्य म्हणून बल्लारपुर नगर परिषदेचे लेखापाल राजेश बांगर, पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता सुजित खामनकर यांच्या मार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी करुन तात्काळ अहवाल देण्याचे निर्देश देवुन सदर निलंबाबत कोणतेही पुरावे आढळून आल्यास नगर परिषदेच्या कपिल नल्लेवार व प्रमोद वाघमारे याना निलंबित करण्याचे कार्यवाही करण्याचे निर्देश द्यावे अशा आशयाचे पत्र सामजिक कार्यकर्ते दिपक वरभे याना जिल्हा प्रशासन अधिकारी नगर विकास शाखा जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपुर यांचे कडून प्राप्त झाले आहे. त्यामुळे दिपक वरभे यानी दिलेला अमोरण उपोषणाचा इशारा मागे घेतला आहे. आता त्रिसदस्यीय समिती काय अहवाल देते आणि जिल्हा प्रशासन त्या अहवालानुसार कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top