Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: बल्लारपूर कॉलरीतील कॅम्प परिसरात पावसाचे पाणी घरात घुसले
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बल्लारपूर कॉलरीतील कॅम्प परिसरात पावसाचे पाणी घरात घुसले रहिवाश्यांचे लाखोंचे नुकसान आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क बल्लारपूर - बल्लारपूरच्या स...
बल्लारपूर कॉलरीतील कॅम्प परिसरात पावसाचे पाणी घरात घुसले
रहिवाश्यांचे लाखोंचे नुकसान
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
बल्लारपूर -
बल्लारपूरच्या सरदार पटेल वॉर्डात असलेल्या कॅम्प परिसरात गेल्या चाळीस वर्षांपासून पावसाचे पाणी शिरत असल्यामुळे नागरिकांचे नुकसान होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे साईडिंग आणि कॅम्प परिसर यांच्यामध्ये नाला वाहत होता. मात्र वेकोलिच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून नाला बुजवून रस्ता करून पाण्याचा प्रवाह अडकला होता. याबाबत आठ महिन्यांपूर्वी वेकोलिच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही त्यांनी या प्रकरणाकडे लक्ष दिले नसल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.
रविवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास अचानक पाऊस सुरू झाला, घरांमध्ये पाणी शिरू लागले आणि घराच्या आत नदीसारखी परिस्थिती पाहून लोकांमध्ये घबराट पसरली, सुमारे तीन ते चार फूट उंच पाणी घरात तुंबले. या वस्तीत सुमारे दोनशे ते तीनशे लोक राहतात. यामध्ये सखल भागातील सुमारे पंचवीस घरांमध्ये रात्रभर पाणी तुंबले. लोकांचे टीव्ही, फ्रीज, कुलर, कपाट, वॉशिंग मशीन, रेशनचे साहित्य आदी पाण्यात भिजल्याने नुकसान झाले आहे. वृत्त प्रकाशित होईपर्यंत तरी कोणतीही सुविधा लोकांसाठी उपलब्ध झालेली नव्हती. वेकोलिच्या अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून जेसीबी मशीन लावून नाल्यात बांधलेला रस्ता फोडून पाणी काढले आहे. लोकांनी प्रशासनाकडे मदतीचे आवाहन केले असून वेकोलि अधिकाऱ्यांनी यावर मौन बाळगले आहे. जेसीबी लावून पाणी काढणाऱ्या ठेकेदाराच्या प्रतिनिधीने सांगितले कि आठ महिन्यांपूर्वी वेकोलि अधिकाऱ्याच्या आदेशावरून नाल्यात माती टाकण्यात आली होती, आज त्यांच्या आदेशावरून रस्ता फोडून पाण्याचा निचरा करण्यात आला आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top