Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गडचांदूर-भोयेगाव-धानोरा-चंद्रपूर मार्ग चौथ्यांदा बंद
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गडचांदूर-भोयेगाव-धानोरा-चंद्रपूर मार्ग चौथ्यांदा बंद वर्धा नदीच्या पूलावरून वाहत आहे पाणी  धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर...
गडचांदूर-भोयेगाव-धानोरा-चंद्रपूर मार्ग चौथ्यांदा बंद
वर्धा नदीच्या पूलावरून वाहत आहे पाणी 
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
धानोरा-गडचांदूर मार्गावरील वर्धा नदीच्या पूलावरून पाणी वाहू लागल्याने हा मार्ग बंद झाला आहे. आत्तापर्यंत चौथ्यांदा धानोरा मार्ग बंद झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. मार्ग बंद झाल्याने जडवाहनांच्या रांगा लागल्या आहे. गडचांदुर भोयेगांव मार्गे चंद्रपूर आणि घुग्गुस चे वाहतूक संपर्क तुटल्याने वाहनांची मोठी रांग लागल्याचे चित्र दिसत आहे.
जुलै महिन्यात जवळपास वीस दिवस संततधार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण होऊन शेती व घरांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. दरम्यान 10 ऑगस्टपासून सूरु असलेल्या पावसाने धानोरा गावाचा संपर्क तुटल्याने नागरिक बेहाल झाले होते. पुरामुळे सभोवतालच्या परिसरातील शेतात पाणीच पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र दिसत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top