Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चंद्रपूर शहरातील साठ वर्षांपूर्वीची तीन मजली इमारत कोसळली!
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बघा थरारक व्हिडीओ डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - शहरातील घुटकाला प्रभागातील तीन मजली इमारत अचानक कोसळल्याने संपूर्ण परिसर ...

बघा थरारक व्हिडीओ
डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
शहरातील घुटकाला प्रभागातील तीन मजली इमारत अचानक कोसळल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला. यात काही व्यक्ती दबले असेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. घुटकाळा वार्डातील राज मंगल कार्यालय परिसरात असून सदर इमारतीत पुंडलिक पाटील आणि त्यांचे कुटुंब या इमारतीत वास्तव्याला होते. इमारत अचानक हलू लागल्याने कुटुंबातील व्यक्ती बाहेर आल्या. मात्र शाहीस्ता खान वय अंदाजे 42 ही महिला मलब्यात अडकली. 
घटनास्थळी चंद्रपूर महानगरपालिकेचे पथक व पोलिसांनी पोहोचून मदत कार्याला सुरुवात केली. जुनी व मोडकळीस आलेली ही इमारत असल्याने मनपाने रिकामी करण्याचा इशारा दिला होता. शहरातील घुटकाला वार्डातील राजमंगल कार्यालय जवळील चार मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली असून यात 3 महिला मलब्यात दबल्याची माहिती आहे. याची माहिती मनपाच्या अग्निशमन दलाच्या विभागाला पाचारण करण्यात आले असून शहर पोलीस सुद्धा घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर मलब्यात दबलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. दरम्यान मलब्यात दबलेल्या नागरिकांची संख्या वाढण्याची नाकारता येत नाही अशीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top