Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: रामपूर-सास्ती रस्ता गेला खड्यात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रामपूर-सास्ती रस्ता गेला खड्यात तात्काळ दुरुस्ती करा अन्यथा 22 तारखेपासून ठिय्या आंदोलन रस्त्याच्या दुरुस्तीकरीता शिवसेनेचे निवेदन विरेंद्र ...
रामपूर-सास्ती रस्ता गेला खड्यात
तात्काळ दुरुस्ती करा अन्यथा 22 तारखेपासून ठिय्या आंदोलन
रस्त्याच्या दुरुस्तीकरीता शिवसेनेचे निवेदन
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
तालुक्यात सतत होणाऱ्या पावसामुळे ओढवलेल्या पुरस्थितीमुळे राजुरा-बल्लारपूर व्हाया बामणी मार्ग तीनदा बंद झाला होता. यामुळे संपूर्ण वाहतूक ही सास्ती-बल्लारपूर मार्गाने होत होती आणि ती अजूनही सुरु आहे. 
वेकोली प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या सोयीसुविधेसाठी तयार केला चेक पोस्ट ते बल्लारपूर हा मार्ग सर्वासामन्य लोकांसाठी खुला करून देण्यात आला यात काही गैर नाही. मात्र या मार्गाने होणाऱ्या जडवाहतुकीमुळे रस्त्याची अवस्था खड्डेमय झाली आहे परिणामता कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे.पीडब्लूडी हद्दीतील सास्ती कॉर्नर ते चेकपोस्ट मार्ग सुद्धा अतिशय बिकट अवस्थेत असून सामान्य नागरिक आणि कर्मचाऱ्यांना जीवघेना प्रवास करावा लागत आहे.
वेकोली प्रशासन याकडे उघड्या डोळ्याने बघून सुद्धा दुर्लक्ष करत आहे. दि. 21 ऑगस्टच्या आधी या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्यात यावे अन्यथा 22 आगस्टपासून शिवसेनेच्या वतीने भव्य मोर्च्या आंदोलन करण्यात येईल अश्या प्रकारचे निवेदन वेकोलि, पीडब्लूडी आणि राजुरा पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे. याप्रसंगी शिवसेना विधानसभा समन्वयक बबन उरकुडे, तालुका प्रमुख वासुदेव चापले, शहर प्रमुख राकेश चिलकुलवार, उपतालुका प्रमुख रमेश झाडे, अभिजित मालेकर आणि पदाधिकारी उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top