Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी राजूरा महिला मंडळ द्वारे ध्वजारोहण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी राजूरा महिला मंडळ द्वारे ध्वजारोहण विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा - राजुरा शहरात आणि तालुक्या...
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी राजूरा महिला मंडळ द्वारे ध्वजारोहण
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
राजुरा शहरात आणि तालुक्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला. दिनांक 15 ऑगस्ट 22 ला राजूरा महिला मंडळ द्वारे मंडळाच्या अध्यक्षा सौ. शुभांगी वाटेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर मंडळातील उपस्थित सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर देशभक्तीपर कविता, गाणे म्हणयात आले. यावेळी वैजयंती देशकर, माणिक देशपांडे, कल्पना वझलवार, कल्पना देशकर, राधिका धनपावडे, सगुणा अवधूत, मंदा पोशेटीवार, नीता देशमुख आणि सीमा देशमुख प्रामुख्याने उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सांगता अध्यक्षीय भाषणाने झाली. कार्यक्रमाचे संचलन सौ. नम्रता खोंड यांनी तर आभार सौ. स्वरूपा झंवर यांनी मानले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top