Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 वर्षांवरील 75 ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 वर्षांवरील 75 ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार बिबी ग्रामपंचायतीचे अभिनव आयोजन धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनि...
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 वर्षांवरील 75 ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार
बिबी ग्रामपंचायतीचे अभिनव आयोजन
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
जिल्हा स्मार्ट ग्राम बिबीच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या विविध गावातील 75 वर्षावरील 75 जेष्ठ नागरिकांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक गुलाब काकडे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून आनंद पावडे, बापूजी पिंपळकर, श्रावण चौके, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकर आस्वले, पोलीस पाटील राहुल आसुटकर, माजी उपसरपंच आशिष देरकर, पांडुरंग लेडांगे, माजी सरपंच संतोष पावडे, ग्रामविकास अधिकारी धनराज डुकरे, शेख रशीद, पुंडलिक मोरे, देवराव ढेंगळे, भानुदास मोतेवाड, शेख पापा, किसन भडके यांचेसह अनेक इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी गावकऱ्यांच्या वतीने ग्रामविकास अधिकारी धनराज डुकरे यांचा आदर्श ग्रामविकास अधिकारी म्हणून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन विठ्ठल टोंगे यांनी केले. प्रस्ताविक पोलीस पाटील राहुल आसुटकर यांनी केले तर आभार ग्रामविकास अधिकारी धनराज डुकरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top