Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: निःशुल्क मोतियाबिंदू नेत्र तपासणी शिबिरात २१३ नागरिकांनी केली तपासणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
निःशुल्क मोतियाबिंदू नेत्र तपासणी शिबिरात २१३ नागरिकांनी केली तपासणी धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - स्वामी विवेकानंद यु...
निःशुल्क मोतियाबिंदू नेत्र तपासणी शिबिरात २१३ नागरिकांनी केली तपासणी
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
स्वामी विवेकानंद युवा मित्र मंडळ व युवा मित्र परिवार नांदा फाटा, आचार्य विनोबा भावे सावंगी मेघे, जिल्हा सामान्य रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र नांदा फाटा यांच्या सहकार्याने समता फाऊंडेशन द्वारा आयोजित निशुल्क मोतीबिंदू नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर आज पार पडले यावेळी नेत्रचिकित्सक डॉ. बुऱ्हाण तसेच डॉ. कुरेशी डॉ. लांडे व प्राथमिक आरोग्य केंद्र नांदा येथील कर्मचारी, स्वामी विवेकानंद युवा मित्र मंडळाचे पदाधिकारी पुरुषोत्तम निब्रड समता फाऊंडेशनचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती या शिबिरात अंदाजे २१३ नागरिकांनी तपासणी करिता सहभाग घेतला तपासणी अखेर शस्त्रक्रियेकरिता ६७ रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालय व वर्धा येथे येत्या २२ आगस्ट व ३ सप्टेंबर ला दोन टप्यात निशुल्क नेण्यात येणार आहे.  यात विशेषतः आशावर्कर चा विशेष सहकार्य लाभले यावेळी मागील महिन्याभर्यापूर्वी गरोदर मातेचा वेदनादायी प्रवास करत रेलवे ने चंद्रपुर ला जावे लागले होते. त्या घटनेत मोलाचा सहकार्य करणाऱ्या आशावर्कर लताताई गेडाम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी नांदा मित्र मंडळींने मोलाचे परिश्रम घेतले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top