Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन तर्फे सायकल वाटप
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन तर्फे सायकल वाटप धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - प्रत्येक व्यक्तीने शिक्षण घेतले प...
अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन तर्फे सायकल वाटप
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
प्रत्येक व्यक्तीने शिक्षण घेतले पाहिजे हे ध्येय लक्षात ठेवत अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेयर फाऊंडेशन, आवारपुर यांनी “हर घर तिरंगा” या कार्यक्रमाचे औचित्य साधत सभोवतालील एकूण आवारपूर, बिबी, नांदा, नोकारी, पालगाव, राजुरगुडा, कोल्हापुरगुडा, तळोधी, बाखर्डी, भोयेगाव, हिरापूर व सांगोळा अशा १२ गावातील २४ गरजू विद्यार्थ्यीनीना सायकलचे वाटप केलेत या सायकलचा वापर त्यांना शाळेत ये-जा करण्याकरता होईल.
या कार्यक्रमाला युनीट हेड, श्रीराम पी.एस., उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिल कुमार नायक, फंक्शन हेड, गौतम शर्मा, सौदीप घोष, संदीप देशमुख, ललित देवपुरा, सुधा श्रीराम, दिव्या शर्मा, पल्लवी घोष, देवपुरा मॅडम तसेच सर्व डिपार्टमेंट हेड आणि ए.बी.पी.एस.स्कूल प्रिन्सिपल, सर्व गावचे सरपंच प्रियांका दिवे, आवारपूर, सुनीता तुमराम, हिरापूर, संजना बोंडे, सांगोडा, संगीता मडावी, नोकारी, ज्योती जेनेकर, तळोधी, शालीनी बोंडे, भोयगाव व पालगांव येथील ग्राम पंचायत सदस्य अनील आत्राम उपस्थित होते.
युनिट हेड, श्रीराम पी.एस. यांनी बोलतानी म्हटले की, शिक्षणा करीता आम्ही सभोवतालील गावाना नेहमी मदत करण्यास तत्पर राहु. कार्यक्रमाचे आयोजन कर्नल दिपक डे यांच्या मार्गदर्शनात सी.एस.आर. प्रमुख सतीश मिश्रा, सचिन गोवारदीपे, संजय ठाकरे व देविदास मांदाळे यांनी अथक प्रयत्न केले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top