Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: लढा कुपोषण मुक्तीचा - "बाळू फाउंडेशन" चा लोकसहभागातून कुपोषण मुक्तीचा प्रयत्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कुपोष मुक्तीच्या उत्कृष्ठ कार्यासाठी जिल्हा परिषद चंद्रपूर कडून मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी यांचे कडून पुरस्कार घेतांना अमित महा...
कुपोष मुक्तीच्या उत्कृष्ठ कार्यासाठी जिल्हा परिषद चंद्रपूर कडून मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी यांचे कडून पुरस्कार घेतांना अमित महाजनवार

लढा कुपोषण मुक्तीचा - "बाळू फाउंडेशन" चा लोकसहभागातून कुपोषण मुक्तीचा प्रयत्न
पंस विस्तार अधिकारी अमित महाजनवार यांच्या संकल्पनेतून कुपोषण मुक्तीचा प्रयत्न

जगातील प्रत्येक तिसरा कुपोषित बालक हा भारतातील आहे. देशातील पाच पैकी फक्त एक बालक सुदृढ आहे. एकंदरीत कुपोषण हा एक शाप आहे. कुपोषणाचे मूळ कारण म्हणजे त्याबद्दल समाजात असलेले अज्ञान हे होय. भारत महासत्ता होण्याची स्वप्ने बघत आहे मात्र जर देशाची येणारी भविष्यातील पिढीच कुपोषित असेल व सदृढ समाज निर्माण होणार नसेल तर मग देश महासत्ता होणार तरी कसा? यासाठी शासन स्तरावर अथक प्रयत्न सुरु असले तरी लोकसहभागाशिवाय कोणत्याही चळवळीला यश मिळत नाही हेही सत्य आहे. 
कुपोषित बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी सिंदेवाही पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अमित महाजनवार यांच्या दृढ संकल्पनेतून चंद्रपूर जिल्ह्यात मागील पाच वर्षांपासून "बाळू फाउंडेशन" सातत्याने कार्यरत आहे. राजुरा आणि जिवती दोन्ही तालुके पुर्णतः "बाळू फाउंडेशनच्या" माध्यमातून कुपोषण मुक्तीच्या मार्गावर आहे. सरकारी सेवा करून कुपोषणमुक्तीच्या प्रचार-प्रसार आणि मदतीचे कार्य करण्यासाठी वेळ नसला तरीही वेळेचे योग्य नियोजन करत अमित महाजनवार यांची बरीच ऊर्जा खर्ची होत असल्याचे दिसून येत आहे. 
नागरिकांच्या अडीअडचणींची जाणीव असणारे शांत-संयमी-मनमिळाऊ अमित महाजनवार यांचाकडे गेलेल्या तक्रारीची ते तात्काळ गंभीर दखल घेत नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करतातच नव्हें तर त्यानां भेटणाऱ्या नागरिकांवर त्यांच्या कार्यपद्धतीचा आणि योग्य मार्गदर्शनही करतात. याबाबतीत सिंदेवाही तालुक्यात अनुभव घेतलेल्या व्यक्तींकडून बोलले जात असलेल्या निदर्शनास येत आहे.
सिंदेवाही पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी म्हणून सेवा देत असतांना "कुपोषण मुक्तीच्या" लढ्यात ग्रामसेवकांना १०% महिला बालकल्याण व ५% अपंग कल्याण व 15 टक्के मागासवर्गीय कल्याण खर्चाचे महत्व ग्रामसेवकांच्या माध्यमातून तसेच लोकसहभागातून कुपोषणमुक्तीच्या लढ्याचा ग्रामस्थांपर्यंत प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न "बाळू फाउंडेशन" च्या वतीने होताना दिसत आहे. वरिष्ठांनी सहकार्य केल्यास शासनाच्या गरोदर माता आणि कुपोषित बालकांविषयीच्या "बाळू फाऊंडेशनच्या" कार्याला सुद्धा सहकार्य लाभेल व "बाळू फाऊंडेशन" च्या कुपोषण मुक्तीच्या कार्याला सिंदेवाही तालुक्यात आलेली छोटीसी मळगळ दूर होईल असे आर्जव वरिष्ठांकडे करण्यात येत आहे. 
आपण सुद्धा समाजाचे देणे लागतो हे बाब ध्यानात ठेवत समाजाचे देणे कोणत्या माध्यमातून फेडायचे विचार ही त्यांना भेडसावत होता. मेळघाटातील गरोदर माता-बालकांच्या कुपोषणाचे-पोषण आहाराअभावी बालमृत्यूची इत्यंभूत माहिती देणारा लेख वाचून अमित महाजनवार यांनी दृढनिश्चय केला आणि त्या वेळी ते चंद्रपूर जिल्हापरिषदे अंतर्गत राजुरा पंचायत समिती येथे विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत होते. तेव्हाच त्यांनी आपला दृढ संकल्प जाहीर केला की मी जे समाजाचे देणे लागतो आहे ते "बाळू फाउंडेशनच्या" माध्यमातून गरोदर माता-कुपोषित बालके यांना मदत करून देणे फेडायचे आणि निदान दुर्लक्षित असलेल्या चंद्रपूर  जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागात कुपोषण मुक्तीचा लढा निश्चयपूर्वक लढून चंद्रपुर जिल्हा कुपोषणमुक्त करण्याचा संकल्प साकार करण्यासाठी मागील पाच वर्षापासून निरंतन "बाळू फाउंडेशनच्या" माध्यमातून कार्य सुरु असून लोकसहभागातून राजुरा आणि जिवती हे दोन्ही तालुके कुपोषण मुक्तीच्या मार्गावर आहेत. सदर कार्य करतांना विविध पारितोषिके-बक्षिसे अमित महाजनवार याना मिळालेली आहेत.
"कुपोषणमुक्तीच्या" उद्दात ध्येयाने प्रेरित होऊन "बाळू फाउंडेशनच्या" माध्यमातून राजुरा तालुक्यात लावलेले छोटेसे रोपटे वटवृक्षात रूपांतरीत होत असतांना जनतेच्या, शासनाच्या तसेच प्रशासनाच्या सहकार्याची नितांत आवश्यकता भासत असल्याचे बाळू चे सर्व कार्यकर्ते बोलून दाखवितात. गरोदर मातांना आणि कुपोषित बालकांना "बाळू फाउंडेशनच्या" माध्यमातून पोषण आहार मिळावा तसेच बाळू फाउंडेशनचे प्रबोधन-जनजागृतीचे सत्कार्य राजुरा-कोरपना-जिवती-गोंडपिपरी-बल्लारपूर-गडचांदूर आदी भागात मोठया जोमाने निरंतर सुरू असून राजुरा आणि जिवती दोन्ही तालुके कुपोषण मुक्तीच्या मार्गावर आहेत. वाढदिवस-लग्नसोहळा-जयंती-उत्सव आदी कार्यक्रमात सुध्दा "बाळू फाउंडेशन" कुपोषणमुक्तीच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करून नागरिकांमध्ये "आपण सुद्धा समाजाचे देणे लागतो" या संकल्पनेचा विचार पोहचवत आहे.
केंद्र आणि राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण मंत्रालयामार्फत कुपोषण निर्मूलनासाठी योजना राबविल्या जातात. यात मॅम व सॅम या दोन प्रकारातील कुपोषित बालकांची वर्गवारी करून महिला व बालविकास प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामीणसह शहरी भागातील अंगणवाडी-मिनी अंगणवाडी केंद्रामार्फत कुपोषित बालकांना पोषण आहार आणि आवश्यक मदत पोहचवली जाते. कुपोषणमुक्त समाज निर्मितीसाठी शासन आणि प्रशासन प्रयत्नशिल आहे. गरोदर महिलांकरिता डॉ.एपीजे अब्दुल कलाम पोषण आहार योजनेच्या माध्यमातून गर्भधारनेपासून ते प्रसूतीनंतर सहा महिन्यांपर्यंत पोषण आहाराची व्यवस्था केली जाते. कुपोषित बालकांसाठी औषधही पुरविले जाते. दरम्यान पालकांना मजुरीचीही व्यवस्था आहे असे असतांना देखील शासनाच्या ज्या यंत्रणेवर कुपोषित बालकांना पोषण आहार आणि आरोग्य यांची जबाबदारी दिली आहे ती यंत्रणा कुचकामी ठरत असल्याने अमित महाजनवार यांच्या संकल्पनेतुन स्थापन "बाळू फाउंडेशन" सरकारचे ध्येय गाठण्यासाठी आणि आपण समाजाचेही देणे लागतो म्हणून अहोरात्र मेहनत घेतांना दिसत आहे. 
आदिवासी बहुल भागात तसेच दुर्गम-अति दुर्गम भागात कुपोषण निर्मूलनाच्या दृष्टीकोनातून बाळू फाउंडेशन आगेकूच करीत आहे. यासाठी बाळू फाउंडेशनचे पदाधिकारीही परिश्रम घेत आहेत. बाळू फाउंडेशनने आजवर विविध प्रकारचे कुपोषणमुक्तीकरिता कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आणि कुपोषणमुक्तीच्या अंतिम क्षणापर्यंत बाळू फाऊंडेशनचा लढा असाच सुरू राहणार आहे. बाळू फाउंडेशनच्या माध्यमातून कुपोषित बालके "शिक्षण पूर्ण होईस्तोवर" दत्तक सुद्धा घेतली जात आहेत. सध्या सिंदेवाही पंचायत समिती विस्तार अधिकारी अमित महाजनवार यांनी सुरू केलेल्या या स्तुत्य उपक्रमाला शासन-प्रशासन आणि जनतेच्या सहकार्याचा आणि मदतीचा हात लाभणे काळाची गरज आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top