Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: पुर ओसरला ; मात्र आताही राजुरा-बल्लारपुर मार्ग बंदच
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पुर ओसरला ; मात्र आताही राजुरा-बल्लारपुर मार्ग बंदच सास्ती मार्गाने वाहतूक सुरु ; दिवसभर रस्त्यांवर वाहतूक कोंडी, वाहनचालक अडकले महाराष्ट्र-...
पुर ओसरला ; मात्र आताही राजुरा-बल्लारपुर मार्ग बंदच
सास्ती मार्गाने वाहतूक सुरु ; दिवसभर रस्त्यांवर वाहतूक कोंडी, वाहनचालक अडकले
महाराष्ट्र-तेलंगाना मार्ग सास्ती मार्गाने चार दिवसांनी झाला सुरू
राजुरा-बल्लारपुर मार्ग उद्यापासून सुरु होण्याची शक्यता
बघा व्हिडीओ - पुलावर पडलेले खड्डे
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
राजुरा -
राजुरा-बल्लारपूर मार्गावरील वर्धा नदीची पाणीपातळी घटल्याने शुक्रवारी दुपारपासून सास्ती मार्गाने वाहतूक सुरु झाली. तिसऱ्यांदा पुरामुळे रस्ता चार दिवस बंद होता. मात्र रामपुरातील सास्ती टी पॉईंट ते सास्ती चेकपोस्ट पर्यंत या मार्गावर खड्डेच खड्डे असल्याने व चार दिवसापासून वाहन चालक अडकून पडल्याने या मार्गावर वाहतूक सुरु होताच शुक्रवार पासूनच एकच वाहतुकीची कोंडी झाली यामुळेही अनेक वाहनचालक ट्राफिक जाम मध्ये अडकले. 

राजुरा-बल्लारपुर वर्धा नदीच्या पुलावरून अजूनही वाहतूक बंदच 
हा पूल उद्यापासून सुरु होण्याची शक्यता
मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी पुलावरून पाणी ओसरल्यानंतर पुलाची पाहणी करण्यात आली. तांत्रिक तपासणी न करता पूर्णपणे पूल उघडणे धोकादायक होऊ शकते, कारण पुलावरून 50 ते 60 टन वजनाचे ट्रेलर जातात. या पुलावर जागोजागी जवळपास चार इंची खड्डे पडल्याने खड्डे बुजविण्यात आले. २४ तासानंतर भरलेले पॅचेस वाळल्यानंतर सदर पुलावरून वाहतूक सुरु होईल अशी माहिती महामार्ग प्रोजेक्ट अधिकाऱ्याने दिली. 

वाहन चालकांमध्ये महामार्ग प्रोजेक्ट विरोधात संताप
वर्धा नदीच्या पुलावरून वाहून जाणारे पाणी ओसरले होते. त्यावेळी तातडीने मार्ग मोकळा करून आवश्यक ती कार्यवाही करतील, अशी अपेक्षा होती. परंतु पूर ओसरून २४ तासाहून अधिक कालावधी लोटूनही वाहतूक सुरु न झाल्याने वाहन चालकांमध्ये नाराजी दिसून आली.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top