तुलाना गावाचा जिनींग जवळ अपघात
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
राजुरा -
राजुरा आसिफाबाद महामार्गावर तुलाना गावाचा जिनींग जवळ अज्ञात वाहनाच्या घडकेत दुचाकीस्वार ठार झाला, तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (12 ऑक्टोबर) सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली आहे़.
पुष्पक राघोबा मालेकर (वय 17, रा. रामपूर) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव असून, राघोबा गणपत मालेकर (वय 42) हा गंभीर जखमी झाला आहे़. दोघेही साखरवाही येथुन शेतीचे कामे आटोपून मोटार सायकल क्रमांक MH-34 AE-2470 ने राजुराकडे येत होते. मात्र अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. यात पुष्पकचा मृत्यू झाला तर राघोबा मालेकर याला उपचाराकरिता चंद्रपूर पाठविण्यात आले आहे. श्रावण नारायण मालेकर रा. पोवणी यांच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध भादंवि 1860 कलम 279,304-A,337 मोटार वाहन अधिनियम 1954 कलम 134B अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.