Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: बल्लारपूर मनसे महिला सेनेने पोलीस बांधवाना राखी बांधून साजरा केला रक्षाबंधन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बल्लारपूर मनसे महिला सेनेने पोलीस बांधवाना राखी बांधून साजरा केला रक्षाबंधन आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क बल्लारपूर - नेहमी समाजकार्यात अग्रेस...
बल्लारपूर मनसे महिला सेनेने पोलीस बांधवाना राखी बांधून साजरा केला रक्षाबंधन
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
बल्लारपूर -
नेहमी समाजकार्यात अग्रेसर असनार्या महाराष्ट्र नवनिर्मान महिला सेनेच्या बल्लारपूर तालुका अध्यक्षा सौ. कल्पनाताई पोर्तलावार यांच्या नेतृत्वात दरवर्षी रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात घेतला जातो यावर्षी सुद्धा मनसेच्या महिला पदाधिकार्यांनी पोलीस स्टेशन बल्लापूर येथील पोलीस बांधवाना राखी बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा केला पोलीस बांधव आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र आपले कर्तव्य बजाऊन आमची रक्षा करतात कोरोना काळात देखील पोलीस बांधवानी नागरीकांची सेवा केली अशीच सेवा आपल्या हातून घळत राहावी व महिलांचे रक्षण करावे यासाठी पोलीस बांधवाना रक्षाबंधन या पवित्र सनाचे औचित्य साधून मनसे महिलासेना बल्लारपूरच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस बांधवाना राखी बांधून शहराच्या रक्षणाचे वचन घेतले यावेळेस बल्लारपूर मनसे महिलासेना तालूका अध्यक्षा सौ. कल्पनाताई पोर्तलावार, तालुका उपाध्यक्ष शालिनी मेश्राम, तालुका सचिव गौराक्का दासरापु, रेखा टिपले, दिव्या दासरापू, गुबूडे, शिल्पा, रेखा मरासकोले आदि मनसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top