राजुरा-सास्ती मार्गाची अवस्था बिकट
खड्ड्यांमुळे चालक, पादचारी हैराण
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
राजुरा -
गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे राजुरा-सास्ती मार्गावर खड्ड्यांनी डोके वर काढले आहे. या मार्गावर जागोजागी मोठं मोठे खड्डे पडल्याने हा मार्ग अत्यंत धोकादायक बनला आहे. या मार्गावरून जा-ये करणारे दररोज ‘काय ते खड्डे, काय तो मार्ग, अन काय लोकप्रतिनिधी!’ म्हणण्याची पाळी वाहनचालकांसह नागरिकांवर वेळ आली आहे.
मध्यंतरी ता रस्त्याचा रुंदीकरण करून दुरुस्ती करण्याचे कार्य सुरु झाले होते, मात्र कुठे माशी शिंकली देव जाणे आणि मध्यंतरी ते काम बंद झाले. या मार्गाबाबत सर्वसामान्यांमधून सातत्याने ओरड होत राहिली आहे. या मार्गावरून वेकोलि कामगार दिवस रात्र जीव मुठीत घेऊन कर्तव्यावर जात असतात. तसेच रामपूर, धोपटाला, सास्ती, बल्लारपूर ला जाणारे हि याच मार्गाने जात असतात. तालुक्याला तीनदा पूर आल्याने तीन वेळा या मार्गाने काही वेळा करिता वाहतूक सुरु होतीच. मात्र या रस्त्यांची दुरवस्था झाली असून या रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता तर पावसाळ्यात या खड्डेमय रस्त्यावरून वाहन चालवणे कठीण बनले आहे. या मार्गावर किरकोळ अपघातांच्या घटना दररोज घडत असून संबंधित विभागाने तकलादू उपाययोजना बाजूला सारून या मार्गाची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.