Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: शनिवार १३ ऑगस्ट ला काँग्रेस द्वारे आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शनिवार १३ ऑगस्ट ला काँग्रेस द्वारे आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन आवाळपूर पासून नांदाफाटा, बिबी ते गडचांदूर या मार्गावर निघणार पदयात्रा धनराजसि...
शनिवार १३ ऑगस्ट ला काँग्रेस द्वारे आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन
आवाळपूर पासून नांदाफाटा, बिबी ते गडचांदूर या मार्गावर निघणार पदयात्रा
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
कोरपना तालुक्यातील सर्व विभागाचे काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या, युवा कार्यकर्ते यांना कळविण्यात येते की, काँग्रेस पक्षातर्फे स्वातंत्र्याच्या हीरक महोत्सव वर्षानिमित्त दिनांक १३ ऑगस्ट २०२२ रोजी  राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा. सुभाष धोटे यांचे उपस्थितीत आजादी गौरव पदयात्रा निघणार आहे. या आजादी गौरव पदयात्रेकरिता कोरपना तालुक्यातील आवाळपूर, नांदा, बिबी आणि गडचांदूर परिसरातील काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने दिनांक १३/०८/२०२२ रोजी आवाळपूर येथील प्रवेशद्वारा जवळील मुख्य चौकात सकाळी ९:०० वाजता उपस्थित राहण्याचे करावे असे आवाहन तालुका काँग्रेस कमिटी, कोरपना तर्फे करण्यात आले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top