Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: देशात 'हर घर तिरंगा' अभियानाला उद्या 13 पासून सुरुवात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
देशात 'हर घर तिरंगा' अभियानाला उद्या 13 पासून सुरुवात प्रत्येकाने ध्वजसंहितेचे पालन करूनच झेंडा लावणे आवश्यक घरोघरी तिरंगा लावताना क...
देशात 'हर घर तिरंगा' अभियानाला उद्या 13 पासून सुरुवात
प्रत्येकाने ध्वजसंहितेचे पालन करूनच झेंडा लावणे आवश्यक
घरोघरी तिरंगा लावताना काय करावे काय नाही, याकळे विशेष लक्ष द्यावे
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात येणारा १५ ऑगस्ट हा 'स्वातंत्र्य दिन' आपण सर्वांनी राष्ट्रीय सण म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करावा, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशात हर घर तिरंगा हे अभियान राबविण्यात येणार आहे. प्रत्येक घरावर तिरंगा लावण्यात येणार असला तरी ध्वजसंहितेचे पालन होणेही आवश्यक आहे. जिल्ह्यात 'घरोघरी तिरंगा' लावताना काय काळजी घ्यावी, तिरंग्याचा मान राखला जावा, यासाठी काय करावे याबाबत नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. आमचा विदर्भ च्या वाचकांसाठी मनातील प्रत्येक प्रश्नांचे उत्तर देण्याचा हा प्रयत्न.

१३ ते १५ ऑगस्ट या काळात नागरिकांनी आपल्या घरावर झेंडा लावावा.
  • ध्वज लावताना केशरी रंगाची बाजू काठीच्या वरच्या टोकाकडे असावी.
  • ध्वज उलटा फडकवला जाणार नाही याची काळजी घ्यावी. 
  • तिरंगी ध्वजाचा आकार आयताकार असावा.
  • झेंड्याची लांबी-रुंदीचे प्रमाण ३ X २ असावे.
  • कातलेल्या, विणलेल्या, मशिनद्वारेतयार केलेल्या सूत, पॉलिस्टर, लोकर, सिल्क किंवा खादीपासून बनविलेल्या कपड्याचा ध्वज असावा.
  • अर्धा तुटलेला, फाटलेला, मळलेला राष्ट्र ध्वज कोणत्याही परिस्थितीत फडकावू नये.
  • कार्यालयांच्या ठिकाणी ध्वज फडकावल्यास ध्वज संहिता पाळावी. ध्वज सूर्योदयावेळी फडकवावा व सूर्यास्तावेळी उतरवावा.
  • घरोघरी तिरंगा फडकावताना तो दररोज सायंकाळी उतरविण्याची गरज नाही.
  • राष्ट्रध्वजासमवेत इतर कोणताही ध्वज एकाच काठीवर फडकावू नये.
  • ध्वज उतरविल्यानंतर त्याची व्यवस्थित घडी घालून तो जतन करून ठेवावा.

काय करू नये :
  • प्लास्टिकच्या ध्वजाचा वापर करू नये.
  • फाटलेला अथवा चुरगाळलेला ध्वज लावू नये.
  • ध्वज ज्या काठीवर फडकत असेल त्या काठीवर किंवा काठीच्या टोकावर फुले किंवा हार घालू नये.
  • अन्य कोणताही ध्वज राष्ट्रीय ध्वजापेक्षा उंच नसावा व राष्ट्रीय ध्वजाच्या लगत नसावा.
  • ध्वजाला माती व पाण्याचा स्पर्श होऊ नये.
  • ध्वज फाटेल अशा पद्धतीने तो फडकवू नये अथवा बांधू नये.
  • ध्वज मलीन होईल अशा पद्धतीने वापरू नये किंवा ठेवू नये.
  • ध्वजावर कोणत्याही प्रकारची अक्षरे लिहू नयेत.
  • राष्ट्रध्वजाचा उपयोग पडद्यासाठी किंवा अन्य कारणासाठी करू नये.
  • अभियान कालावधीनंतर झेंडा फेकू नये. तो सन्मानाने जतन करावा.
  • तिरंग्याचा वापर कोणतीही वस्तू झाकण्या करिता किंव्हा गुंडाळण्या करिता करू नये.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top