Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: चिंचोलीतील पन्नासहून अधिक शेतकरी नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चिंचोलीतील पन्नासहून अधिक शेतकरी नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित ऑक्टोबर २०१९ मध्ये आलेल्या अतिवृष्टीमुळे झाले होते आतोनात नुकसान शेतकऱ्यांनी ...
चिंचोलीतील पन्नासहून अधिक शेतकरी नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित
ऑक्टोबर २०१९ मध्ये आलेल्या अतिवृष्टीमुळे झाले होते आतोनात नुकसान
शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय व माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांना दिले निवेदन
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क 
राजुरा -
राजुरा तालुक्यातील मौजा चिंचोली येथे ऑक्टोबर २०१९ मध्ये आलेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास १५७ शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले होते. त्यावेळी महसूल विभागाकडून पंचनामे ही करण्यात आले होते. त्यात काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कमही देण्यात आली होती मात्र मात्र अजूनही त्यातील ५०-६० शेतकऱ्यांना नुकसानाची भरपाई मिळालेली नव्हती. त्यानंतर लगेच कोरोनाचा संसर्ग वाढल्याने त्या लोकांची रक्कम शासनाला परत पाठविण्यात आली असे शेतकऱ्यांना सांगण्यात आले होते. मात्र आता कोरोनाचा संसर्ग हद्दपार झाला असून वंचित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम देण्यात यावी याबाबतीचे निवेदन तहसील कार्यालय तसेच माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांना देण्यात आले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष रंजन लांडे, इर्शाद शेक, धनराज चिंचोलकर, चेतन जयपूरकर, संभा नागापुरे, लखन भोंगळे, बाबा डाहुले, राजू नवघरे, संतोष राऊत, जयंता बोरकुटे ईत्यादी उपस्थित होते. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top