Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालयात कॅम्पस मध्ये 20 पदवीधर विद्यार्थ्यांना मिळाला रोजगार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालयात कॅम्पस मध्ये 20 पदवीधर विद्यार्थ्यांना मिळाला रोजगार धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर -...
महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालयात कॅम्पस मध्ये 20 पदवीधर विद्यार्थ्यांना मिळाला रोजगार
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
स्थानिक महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स येथे कॅम्पस प्लेसमेंटचे आयोजन दि. 20 ऑगस्ट ला करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेट सेल आणि स्टॉप कॅन्सर मल्टिपर्पज मिशन, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह राबविण्यात आला.
स्टॉप कॅन्सर मल्टिपर्पज मिशन नागपूर हि एक नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनाईझशन (NGO) असून सेवाभावीवृत्तीने संपूर्ण देशभर कार्य करते. कॅन्सर सारखा अति दुर्धर रोग संपूर्णपणे नष्ट व्हावा म्हणून वेगवेगळ्या महाविद्यालयात अश्या प्रकारचे कार्यक्रम राबवितात. त्याचाच एक भाग म्हणून महात्मा गांधी महाविद्यालयात प्रबोधन व जॉब प्लेसमेंट चे नियोजन करण्यात आले आहे. या मिशन चे डेप्युटी डायरेक्टर कमल गौतम, जिल्हा प्रभारी अजय ठाकरे, रोहित येडे, सचिन कांबळे व डिम्पल येडे या सहकार्यांनी महाविद्यालयात येऊन हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. महाविद्यालयातील पदवी प्राप्त झालेले तसेच परिसरातील इतर महाविद्यालयातील पदवी प्राप्त विद्यार्थी असे एकूण 60 विद्यार्थी यासाठी मुलाखतीला हजर होते. 20 विद्यार्थ्यांना सेवाभावी संथेच्या विविध पदाकरीता निवडण्यात आले आहेत. महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जॉब प्लेसमेंट करिता हा पहिला प्रसंग नसला तरी एकावेळी एवढे विद्यार्थी जॉब साठी पात्र पहिल्यांदाच आले होते. कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह च्या उद्घाटन समारंभाला ला प्रमुख अतिथी म्हणून  महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयाच्या  प्राचार्या सौ. स्मिता चिताडे यांनी आलेल्या विद्यार्थ्याना प्रोत्साहन दिले. महाविद्यालयाचे प्राचार्य रामकृष्ण पटले यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले आणि पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. डॉ अनिस खान यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमचे नियोजन ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल चे अधिकारी प्रा. पवन चटारे यांनी केले तसेच प्रा. मनोहर बांद्रे व इतर प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top