राजुरा-बल्लारपूर मार्ग तिसऱ्यांदा बंद
इरईचे सात दरवाजे उघडले
दुबार आणि तिबार पेरणीच्या संकटाने बळीराजा हवालदिल
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
राजुरा -
शनिवारपासून वैनगंगा, वर्धा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये व चंद्रपूर जिल्ह्यात सतत होत असलेल्या पावसामुळे वैनगंगा नदीवरील गोसेखुर्द प्रकल्प, वर्धा नदीवरील अप्पर वर्धा प्रकल्प व निम्न वर्धा प्रकल्प, इरई नदीवरील इरई धरण, पैनगंगा नदीवरील ईसापुर धरण व वर्धा नदीच्या उपनद्या वरील धरणांमधून अधिकचे विसर्ग प्रवाहित करण्यात येत आहे. वर्धा नदीची पातळी वाढल्याने सोमवारी सकाळपासूनच भोयगांव-धानोरा पुलावरून पाणी वाहत असल्याने या मार्गावरून वाहतूक बंद करण्यात अली होती. रात्रीही संततदार पडलेल्या पावसाने आणि इरई धरणाचे सातही दरवाजे उघडल्याने वर्धा नाडीची पाण्याची पातळी वाढल्याने आज सकाळी १० वाजतापासूनच्या दरम्यान राजुरा-बल्लारपूर मार्ग तिसऱ्यांदा बंद झाला त्यामुळे तेलंगणाला जोडणाऱ्या महामार्गावरील वाहतूक सास्तीमार्गे होत असली तरी सायंकाळपर्यंत हाही मार्ग बंद होईल कि काय अशी भीती व्यक्त केली जात आहे.
अतिवृष्टीमुळे पाण्याचा येवा वाढल्यास धरणातून विसर्ग पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. परिणामी, जिल्ह्यात वाहणाऱ्या वैनगंगा, वर्धा, पैनगंगा व इरई या नद्यांकाठी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. सध्या हवामान विभागाने दिलेला पावसाचा रेड अलर्ट व ऑरेंज अलर्ट तसेच वैनगंगा, वर्धा, पैनगंगा व इरई नदीच्या पाण्याची वाढती पातळी लक्षात घेता प्रशासनाने सतर्कतेचा ईशारा दिला आहे. भारतीय हवामान विभागाने ८ ते १० ऑगस्ट रोजी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर आज चंद्रपूरसाठी रेड अलर्ट आहे.
इरईचे सात दरवाजे उघडले; पुराचा धोका वाढला
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.