Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: वन महोत्सवाच्या माध्यमातून मानव आणी जंगल यांचे दृढ नाते जोपासले जाते - वनपरीक्षेत्र अधिकारी जी. आर. इंगळे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वन महोत्सवाच्या माध्यमातून मानव आणी जंगल यांचे दृढ नाते जोपासले जाते - वनपरीक्षेत्र अधिकारी जी. आर. इंगळे आदर्श शाळेत वनमहोत्सव अंतर्गत वृक्...
वन महोत्सवाच्या माध्यमातून मानव आणी जंगल यांचे दृढ नाते जोपासले जाते - वनपरीक्षेत्र अधिकारी जी. आर. इंगळे
आदर्श शाळेत वनमहोत्सव अंतर्गत वृक्षारोपण संपन्न
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
भारतीय संस्कृतीमध्ये माणूस आणि जंगल या मधील संबंध नाना प्रकारे सांगितले गेले आहे परंतु गेल्या काही दशकांत आपण त्यापासून दूर जाऊ लागलो आहोत आणि हे पूर्णपणे चुकीचे आहे ही जाणीव व्हावी आणि ही परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न प्रत्येकाकडून अच केला जावा यासाठी वन महोत्सवांमधून प्रोत्साहन दिले जाते. असे प्रतिपादन जी. आर. इंगळे, वनपरीक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनिकरण परीक्षेत्र राजुरा यांनी अध्यक्षीय स्थानावरून केले.
बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल राजुरा येथील राष्ट्रीय हरित सेना (इको क्लबच्या) वतीने वनमहोत्सव अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून वनपाल बी.सी. ब्रह्मटेके, व्ही.एम. कुंदोजवार, व्ही.एच चव्हाण, पी.एन. अनमूलवार, वनरक्षक जी.एस. तम्मीवार, ताकसांडे, आदर्श प्राथमिकच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, आदर्श हायस्कुल चे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभुळकर आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राष्ट्रीय हरीत सेना विभाग प्रमुख बादल बेले यांनी केले. यावेळी विद्यार्थी प्रमुख राधिका चेडे व साहिल नंदिगमवार यांनी बर्ड फिडर देऊन उपस्थितांचे स्वागत केले. विविध प्रकारच्या वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी वन महोत्सवाचे महत्त्व सांगितले. खरे तर जंगलांपासून फक्त मानवालाच नाही तर संपूर्ण सजीव- निर्जीव सृष्टीला अनेक फायदे होतात हवामानाचे संतुलन, नियमित पाऊस,  शुद्ध हवा, वाळवंटीकरणतून उद्भवणाऱ्या समस्या दूर करणे, पशुपक्ष्यांना योग्य अधिवास, जमिनीची धूप तसेच पाण्याचे आक्रमण थोपविणे हे फायदे तर होतातच शिवाय आपल्याला लाकूड आणि इतर वनसंपत्ती मिळते ही वेगळीच बाब पण आपण हावरटपणा ने तात्पुरत्या फायद्याच्या मागे लागून जंगलांतील तोडकर चालला हो ती थांबवण्याची गरज मान्यवरांनी व्यक्त केली.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top