Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: जंगली डुकराचा हल्यात शेतकरी गंभीर जखमी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जंगली डुकराचा हल्यात शेतकरी गंभीर जखमी मूल तालुक्यातील चिखली येथील घटना आमचा विदर्भ - ब्युरो रिपार्ट्स मूल - शेतातील काम आटोपुन घरी परत येत ...
जंगली डुकराचा हल्यात शेतकरी गंभीर जखमी
मूल तालुक्यातील चिखली येथील घटना
आमचा विदर्भ - ब्युरो रिपार्ट्स
मूल -
शेतातील काम आटोपुन घरी परत येत असणाऱ्या शेतकऱ्याला शेतात असलेल्या जंगली डुकरांनी अचानक हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना मूल तालुक्यातील मौजा चिखली येथे आज 4 जुलै दुपारी 3.30 वाजताच्यादरम्यान घडली. डेमाजी रामजी चुदरी वय 55 वर्षे असे जंगली डुकराच्या हल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नांव आहे.
चिखली येथील शेतकरी डेमाजी चुदरी यांची कन्हाळगाव मार्गावर शेती आहे. ते सकाळी शेतात गेले होते, शेतातील कामे आटोपून चिखली येथे परत येत असताना जंगली डुकराने त्यांच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले. सदर माहिती चिखली येथील गावकऱ्यांना माहिती होताच त्यांनी गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या चुदरी यांना मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात आणून त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले आणि त्यांना चंद्रपूर हलविण्यात आले.
सदर घटनास्थळ हे सावली वन परिक्षेत्रातील जंगलाला लागुन आहे. घटनेची माहिती मिळताच वन परिक्षेत्राधिकारी वसंतराव कामडी, वनरक्षक धनविजय घटनास्थळी दाखल होवून पंचनामा केला. पुढील तपास सुरु आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top