Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: राजुरा वन परिक्षेत्रात कौशल्य विकास तथा स्वयंरोजगार कार्यशाळा संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा वन परिक्षेत्रात कौशल्य विकास तथा स्वयंरोजगार कार्यशाळा संपन्न मध्य चांदा वन विभागचा स्तुत्य उपक्रम आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राज...
राजुरा वन परिक्षेत्रात कौशल्य विकास तथा स्वयंरोजगार कार्यशाळा संपन्न
मध्य चांदा वन विभागचा स्तुत्य उपक्रम
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजने अंतर्गत असलेल्या गावातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवती करिता रोजगार व स्वयंरोजगार मिळवून देण्याच्या दृष्टीने उप वनसंरक्षक मध्यचांदा वनविभागाच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन वनोद्यान वनपरिक्षेत्र कार्यालय राजुरा येथे आयोजित करण्यात आले होते.
सदर कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शिका म्हणून प्रथम एज्युकेशन फाउंडेशन मुंबई यांचे प्रतिनिधी भारती प्रजापती यांनी युवक युवतींना मोलाचे मार्गदर्शन केले व प्रशिक्षणाला हजर राहण्याकरिता संबोधित केले. सदर कार्यक्रमादरम्यान वनपरिक्षेत्र कार्यालय राजुरा, बल्लारशा व विरुर या परीक्षेत्रातील युवक युती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मध्य चांदा वनविभागाच्या उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय वन अधिकारी अमोलकुमार गर्कल, सहाय्यक वनसंरक्षक श्रीकांत पवार, नैसर्गिक पर्यवरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले उपस्थित होते. प्रास्ताविक राजुराचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड यांनी केले. संचालन क्षेत्र सहायक नरेंद्र देशकर यांनी तर आभार वनरक्षक सुनील गजलवार यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता वनपरिक्षेत्र अधिकारी बल्लारशाह चे नरेश भोवरे, विरुरचे वनपरिक्षेत्र अधिकारी देवराव पवार, क्षेत्र सहाय्यक प्रकाश मत्ते, संतोष संगमवार, सर्व वनरक्षक, वनमजुर यांनी सहकार्य केले. या कार्यशाळेचा संयुक्त वन व्यवस्थापन समितीत असलेल्या राजुरा, बल्हारशाह, विरुर, वनपरिक्षेत्रातील सुशिक्षित बेरोजगार युवक मोठ्या संख्येत या कार्यशाळेचा लाभ घेतला.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top