Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चंद्रपूर-मूल मार्गावर बस व ट्रकचा अपघात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चंद्रपूर-मूल मार्गावर बस व ट्रकचा अपघात अपघातात चार जण जखमी आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क मूल - मूल वरून चंद्रपूर कडे जाणारी बस आणि चंद्रपूर व...
चंद्रपूर-मूल मार्गावर बस व ट्रकचा अपघात
अपघातात चार जण जखमी
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
मूल -
मूल वरून चंद्रपूर कडे जाणारी बस आणि चंद्रपूर वरून मूल कडे जाणाऱ्या ट्रकची समोरा-समोर धडक झाल्याने चार जण जखमी झाल्याची घटना मूल-चंद्रपूर मार्गावर आज 4 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान घडली.
परिवहन महामंडळाची बस क्रं. एमएच ४० एक्यु ७४४ ही बस मूल बस स्थानकावरून चंद्रपूर कडे जात होती तर चंद्रपूर वरून ट्रक क्रमांक सीजी ०४ आयएफ ६२५५ हा मूल कडे येत होता, या दरम्यान बस आणि ट्रक मध्ये झालेल्या अपघातात चालकांसह चार प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेची माहिती मूल पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी पोहचून तात्काळ जखमींना उपचारार्थ स्थानिक उपजिल्हा रूग्णालयामधुन जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविले. पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top