Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: प्रेयसीसोबत लॉजवर गेलेल्या तरूणाचा संशयास्पद मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
प्रेयसीसोबत लॉजवर गेलेल्या तरूणाचा संशयास्पद मृत्यू खिशात सापडलं स्टॅमिना वाढवणाऱ्या गोळ्यांचं पाकीट आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क नागपूर - सा...
प्रेयसीसोबत लॉजवर गेलेल्या तरूणाचा संशयास्पद मृत्यू
खिशात सापडलं स्टॅमिना वाढवणाऱ्या गोळ्यांचं पाकीट
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
नागपूर -
सावनेर येथील केशव लॉजमध्ये रविवारी तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला. घटनेच्या वेळी खोलीत 23 वर्षीय तरुणी तरुणासोबत असल्याने या घटनेबाबत परिसरात विविध चर्चा सुरू आहेत. माहितीनुसार, अजय जानलुजी परतेकी वय 27 वर्षे हा तरुण सावनेर बसस्थानकाच्या मागे असलेल्या केशव लॉजवर एमएच 40/बीएन 5541 क्रमांकाच्या मोटारसायकलवरून पांढुर्णा एमपी येथील रहिवासी मुलीसह तीनच्या सुमारास आला. रविवारी दुपारी दोघांनी लॉजमध्ये रूम क्र.102 बुक केली. त्यानंतर 4.30 च्या सुमारास अचानक मुलगी केशव लॉजच्या रिसेप्शनवर पोहोचली आणि तिच्या मित्र अजयची अचानक प्रकृती बिघडल्याचे व्यवस्थापकाला सांगितले. त्याचवेळी लॉजच्या व्यवस्थापकाने खोलीत जाऊन पाहिले असता तरुण बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. व्यवस्थापकाने तत्काळ सावनेर पोलिसांना याची माहिती दिली. सावनेर पोलिस ठाण्याचे एपीआय सतीश पाटील यांनी कर्मचाऱ्यांसह लॉजवर पोहोचून तरुणाला उपजिल्हा रुग्णालयात सावनेर येथे उपचारासाठी नेले. तेथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मुलीची चौकशी सुरू आहे. तरुणाचा मृत्यू खरोखरच प्रकृती अस्वास्थ्यामुळे झाला आहे, हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच कळेल.

हृदयविकाराची शक्यता
अजय व त्याची मैत्रीण तीन वर्षांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून एकामेकांच्या संपर्कात आले होते. दोघेही विवाह बंधनात अडकणार होते. अजयचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे. त्याच्याजवळ काही संशयास्पद वस्तू आढळून आल्या नाहीत. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल. मात्र मिळालेल्या माहितीनुसार त्यानं स्टॅमिना वाढवणाऱ्या गोळ्यांचं अतिसेवन केल्यामुळं त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अजयच्या खिशात स्टॅमिना वाढवणाऱ्या गोळ्यांचं पाकीट आढळून आल्याच ही सांगण्यात येत आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top