Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: सुगंधित तंबाखूची सर्रास विक्री
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सुगंधित तंबाखूची सर्रास विक्री युवक व महिलाही व्यसनाचा आहारी आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क चंद्रपूर - सुगंधित तंबाखूची साठवणूक, विक्री, व वितर...
सुगंधित तंबाखूची सर्रास विक्री
युवक व महिलाही व्यसनाचा आहारी
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
चंद्रपूर -
सुगंधित तंबाखूची साठवणूक, विक्री, व वितरण प्रणालीवर राज्यात 20 जुलै 2012 पासून कायद्याने बंदी आणली असतानाही तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखूची सर्रास विक्री व साठवणूक होत असून याचा गंभीर परिणाम तरुण, महिलांच्या आरोग्यावर होत असून याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आरोग्यास अपायकारक असणाऱ्या सुगंधित तंबाखूवर शासनाने कायद्याने बंदी आणली आहे. बंदी असतानाही तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखुची साठवणूक व विक्री होत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भेसळयुक्त सुगंधित तंबाखूचे सेवन लहानांपासून मोठ्यांपर्यंत करीत असल्याने सुगंधित तंबाखूवर प्रतिबंध घालण्यात यावा. यासाठी अनेक सामाजिक संघटना सरसावत असतांनाही सुगंधित तंबाखूची विक्री होत असल्याचे विदारक चित्र आहे. सुगंधित तंबाखू तस्कर तालुक्यातील शहर, ग्रामीण भागात आपल्या विक्रेत्यामार्फत मोठ्या प्रमाणात साठवणूक करीत आहेत. गाडी नंबर प्लेट बदलवून, आड मार्गाने सुंगांधित तंबाखूची आयात, निर्यात होत आहे. प्रशासनाने स्थानिक यंत्रणेची मदत घेऊन कार्यवाही केल्यास अवैध धंद्यावर वचक बसण्यास मदत होईल. अन्न व औषध प्रशासन (एफ. डी. ए.) विभागाने योग्य ती कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

शासकीय कार्यालय परिसरात विक्री
शासकीय परिसर, कार्यालय या परिसरात 100 मीटरच्या आत सुगंधीत तंबाखू खरेदी, विक्रीला प्रतिबंध आहे. असे असतानाही कार्यालयाच्या शंभर मीटरच्या आत सुगंधी तंबाखूची खरेदी, विक्री जोरात सुरू असल्याने प्रशासनाच्या कार्यशैलीबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात होत असलेली साठवणूक हा चिंतेचा विषय असून यावर शासनाने योग्य ती कठोर कारवाई करावी अशी तालुक्यातील अनेक नागरिकांनी मागणी केली आहे.

युवक व महिलांनाही व्यसन
तरुण युवक, महिला सेवन करीत असल्याने येणाऱ्या भावी पिढी बद्दल अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी, संघटनांनी चिंता व्यक्त केली असून सुगंधित तंबाखू व अवैध मार्गाने होणारे व्यापार यावर प्रतिबंध घालण्यात यावा. अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top