Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: वरोरा येथे कारगिल विजय दिवस साजरा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वरोरा येथे कारगिल विजय दिवस साजरा सादिक थैम - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी वरोरा - येथील एअर बॉर्न ट्रेनिंग स्कूल, पैगाम साहित्य मंच, योगी अ...
वरोरा येथे कारगिल विजय दिवस साजरा
सादिक थैम - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
वरोरा -
येथील एअर बॉर्न ट्रेनिंग स्कूल, पैगाम साहित्य मंच, योगी अरविंद बहुद्देशीय संस्था व माजी सैनिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. 
यावेळी भारतीय सैन्याचा कारगिल युद्धात अदम्य पराक्रम गाजवत शत्रू सैन्याला नामोहरण करून विजयश्री मिळविल्याबद्दल भारतीय सैनिकांचे अभिनंदन करून  या कारगिल युद्धात आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी शौर्याने लढत देशासाठी प्राण देणा-या सैनिकांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
भारतीय सैनिकांनी केलेल्या अदम्य पराक्रमाची गाथा नवींन पिढीला कळण्यासाठी तथा शहीद जवानाप्रती आदरांजली म्हणून आयोजित कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. शहीद योगेश डाहूले स्मारक चौकात झालेल्या या कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा भाजपा सचिव अहेतेशाम अली यांच्या उपस्थितीत शहीद विर जवानांना आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी सोबत असलेले सर्व माजी सैनीकांचे मनोबल वाढवून "भारत माता की जय"  "जय हिंद -जय भारत" असे नारे लावण्यात आले या प्रसंगी माजी सैनिक सुरेश बोभाटे, वामन राजुरकर, सागर कोहळे, अनिल चौधरी, रवि तुराणकर, शेषराव कडूकर, निलेश पावडे, रुबेश्वर कुत्तरमारे, प्रवीन चिमुरकर या सर्व माजी सैनीकांसोबत सामाजिक कार्यकर्ते व मित्र परिवार यांची उपस्थिति होती.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top