Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: लखमापूर येथील सौंदर्यीकरण दिवाळीपर्यंत पूर्ण करण्‍याचा प्रयत्‍न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
लखमापूर येथील सौंदर्यीकरण दिवाळीपर्यंत पूर्ण करण्‍याचा प्रयत्‍न लखमापूर हनुमान मंदीर येथे सौंदर्यीकरण व संरक्षण भिंतीच्‍या बांधकामाचा भूमीपू...
लखमापूर येथील सौंदर्यीकरण दिवाळीपर्यंत पूर्ण करण्‍याचा प्रयत्‍न
लखमापूर हनुमान मंदीर येथे सौंदर्यीकरण व संरक्षण भिंतीच्‍या बांधकामाचा भूमीपूजन सोहळा संपन्‍न
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
चंद्रपूर -
भगवान श्री हनुमानजींनी आपल्‍याला सेवा करणे शिकविले आहे. लोकप्रतिनिधी म्‍हणून जनतेची सेवा मी अव्‍याहतपणे करीत आहे. ९ एप्रिल २०२२ रोजी मी लखमापूरच्‍या हनुमान मंदिरात आलो असता येथील भक्‍तगणांनी सौंदर्यीकरण व संरक्षण भिंतीच्‍या बांधकामाची मागणी माझ्याकडे केली. यासाठी मी ६० लक्ष रूपयांचा निधी मंजूर केलेला आहे. आज १०८ व्‍या दिवशी मी येथे भूमीपूजन करण्‍यासाठी आलो आहे. येत्‍या दिवाळीपर्यंत या कामाचे उदघाटन करण्‍याचा प्रयत्‍न आपण निश्‍चीतपणे करू, असे प्रतिपादन माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
चंद्रपूर तालुक्‍यातील लखमापूर येथील हनुमान मंदिराच्‍या सौंदर्यीकरणाच्‍या तसेच संरक्षक भिंतीच्‍या बांधकामाच्‍या भूमीपूजन सोहळयात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, महानगर भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, भाजपा नेते राजेंद्र गांधी, रामपाल सिंह, माजी महापौर सौ. राखी कंचर्लावार, सौ. अंजली घोटेकर, रविंद्र गुरनुले, भाजपाचे तालुकाध्‍यक्ष हनुमान काकडे, मंदीर ट्रस्‍टचे अध्‍यक्ष सुरेश शर्मा, माजी जि.प. सदस्‍या रोशनी खान, वनिता आसुटकर, विलास टेंभुर्णे, माजी पंचायत समिती सभापती केमा रायपुरे, भाजपा महानगर कोषाध्‍यक्ष प्रकाश धारणे, अनिल डोंगरे, नामदेव आसुटकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अ.ल. भास्‍करवार आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, पंढरपूर येथे मी तुळशी वृंदावन उद्यान निर्माण केले याचा मला आनंद आहे. अनेक प्रकारच्‍या तुळशी, विठ्ठलाची मोठी प्रतिमा त्‍याठिकाणी आहे. मंत्री पदाच्‍या काळात अनेक तिर्थक्षेत्राचा विकास मी केला. निराधार, विधवा, परित्‍यक्‍ता यांच्‍या अनुदानात मोठया प्रमाणावर वाढ केली. सेवेचा हा प्रवास असाच निरंतर चालु राहणार आहे. यासाठी श्री हनुमानजी अधिक शक्‍ती देतील, असेही आ. सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले.
या कार्यक्रमाला भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते, भजन मंडळी, मंदिराचे विश्‍वस्‍त, लखमापूरचे नागरीक आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top