Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: चुनाळा येथे युवा शेतकऱ्याची आत्महत्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चुनाळा येथे युवा शेतकऱ्याची आत्महत्या राजुरा - यावर्षी सतत पडत असलेल्या पावसाने आलेल्या दोनदा पुराच्या पाण्यानेशेतकरी पुरता हवालदिल झाला आहे...
चुनाळा येथे युवा शेतकऱ्याची आत्महत्या
राजुरा -
यावर्षी सतत पडत असलेल्या पावसाने आलेल्या दोनदा पुराच्या पाण्यानेशेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. अश्यातच चुनाळा येथील शेतकरी
रविंद्र नारायण मोंढे वय 45 वर्षे यांनी आज दिनांक 27 जुलै ला आपल्या राहते घरी दुपारी दीड वाजताच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उजेडात आली आहे. 
रविंद्र कडे सात एकर जमीन आहे. रविंद्रने सेवा सहकारी संस्था मर्यादित, चुनाळा येथून शेतीकरिता सत्तर हजार रुपयांचे पीक कर्ज उचल करून शेतात कपाशी व सोयाबीन पिकांची पेरणी केली होती. रविंद्र हा एकुलता एक मुलगा असल्याने घरच्या म्हातारे आई-वडील यांचा सांभाळ वर्षभर शेतातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या भरवशावर करीत होता. मात्र वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे या एक महिन्यात चार वेळा पुराच्या पाण्याखाली शेतपिक आल्यामुळे त्याचे संपूर्ण पीक उध्वस्त झाले. त्यापूर्वीही दुबार पेरणीच्या संकटाला समोर जावे लागले होते. मिळालेल्या माहितीनुसार रवींद्रच्या आईला विद्युत शॉक लागल्याने त्या दवाखान्यात उपचार घेत होत्या. घरची परिस्थिती हलाकीची असल्याने बँकेचे कर्ज आणि इतरांकडून हात उसने घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत असलेल्या रविंद्रने आपल्या राहते घरी कोणीच नसल्याचे पाहून गळफास घेत आत्महत्या केली. ही बाब शेजारच्या नागरिकांच्या लक्षात येताच राजुरा पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता राजुरा येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात आणला. रविंद्र यांच्या पश्चात्य आई व वडील असून रविंद्रच्या जाण्याने मोठे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top