Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: कीटकनाशकांची फवारणी करताना योग्य ती काळजी घ्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कीटकनाशकांची फवारणी करताना योग्य ती काळजी घ्या कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क चंद्रपूर - कीडीच्या नियंत्रणासाठी...
कीटकनाशकांची फवारणी करताना योग्य ती काळजी घ्या
कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
चंद्रपूर -
कीडीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांकडून कीटकनाशक व तणनाशकांची फवारणी केली जाते. ही फवारणी करताना शेतकऱ्यांकडून योग्य ती काळजी घेतली जात नाही. कीटकनाशके व तणनाशके नाका - तोंडावाटे शरीरात गेल्याने धोका उद्भवतो. त्यामुळे फवारणी करताना योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी खात्याने केले आहे. शेतकऱ्यांना तण काढण्यासाठी अधिक खर्च येतो. यासाठी ते औषध फवारणीचा पर्याय स्विकारतात. पिकांवर औषध फवारणी कारण्याआधी कीटकनाशक डब्यावर असलेली माहिती काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. औषध विक्रेत्याने सुचविल्याप्रमाणे
औषधांची मात्रा घेऊन योग्यप्रकारे फवारणी करावी. अनेकजण खबरदारी घेत नाहीत. त्यामुळे त्यांना जीव गमवावा लागतो. असे न करता योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे असून, यासाठी कृषी खाते शेतकऱ्यांत जनजागृती करत आहे. अनेक शेतकरी कीटकनाशके व तणनाशके वापरतात. हे करताना त्यांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. फवारणी करताना हातमोजे मास्क वापरावेत. फवारणी केल्यानतर पंप व्यवस्थित स्वच्छ करावा. चार प्रकारची कीटकनाशके असतात त्यात लाल, पिवळा, निळा व हिरवा यांचा समावेश होतो. यातील हिरव्या रंगाच्या किटकनाशकाची शेतकऱ्यांनी फवारणी करावी, याकरिता कृषी विभाग याबाबत जागती करत आहे.

अशी घ्या काळजी
कीटकनाशकांचे मिश्रण करताना हातमोजे वापरावेत, फवारणी करताना तोंडाला मास्क बांधावा, औषध फवारणी करताना धूम्रपान, तंबाखू, गुटखा सेवन टाळावे, वाऱ्याची दिशा पाहून फवारणी करावी, फवारणी केल्यानंतर शेतात जाऊ नये, फवारणीवेळी पंपाचे नोझल दूर ठेवावे, फवारणीनंतर हातपाय स्वच्छ धुवूनच अन्न ग्रहण करावे, औषधांचे रिकामी डबे नष्ट करावेत, वैध मुदतीत असणाऱ्या कीटकनाशकांची खरेदी करावी आदी सूचना करण्यात आल्या.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top