Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: सोशल मीडियावर बदनामी करणारी पोस्ट भोवली
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सोशल मीडियावर बदनामी करणारी पोस्ट भोवली प्रादेशिक वृत्तपत्राच्या वार्ताहरावर खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क राजुरा - ...
सोशल मीडियावर बदनामी करणारी पोस्ट भोवली
प्रादेशिक वृत्तपत्राच्या वार्ताहरावर खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
राजुरा -
नागपूरहून प्रकाशित एका प्रादेशिक वृत्तपत्राचे देवाडा प्रतिनिधी सय्यद जाकीर याच्या विरोधात राजुरा पोलीस स्टेशन मध्ये पैश्याची मागणी करणे, सोशल मिडीयाच्या माध्यमाने समाजात जाणीवपूर्वक बदनामी करणे या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राजुरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिव कु. मंगला मेश्राम यांच्या विरोधात सय्यद जाकीर राहणार राजुरा यांनी मागील काही दिवसापासून सोशल मिडीयाच्या माध्यमाने त्यांच्या विरोधात हेतुपुरस्पर गैरव्यवहार व बाजार समितीत अनियमितता केल्याचा ठपका ठेऊन बदनामीकारक पोस्ट करत होता तसेच गैरव्यवहाराचे पुरावे असल्याचे सांगत पैशाचीही मागणी करीत होता. यासंदर्भात सर्व पोस्ट केलेल्या कॉपीसह रितसर तक्रार कु. मंगला मेश्राम यांनी पोलिसांत केली. राजुरा पोलिसांनी सय्यद जाकीर याच्या विरुद्ध अपराध क्र.२९३/२०२२ नुसार कलम ३८५,५०१ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादूर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विजय खोब्रागडे व पोलीस करीत आहे. प्रकरणाच्या चौकशीअंती योग्य कारवाई करण्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसी हिसका दिसताच संबंधित आरोपीने पोस्ट डिलीट केल्या, भाग एक, भाग दोन अश्या जवळपास दहा-पंधराच्या वर पोस्ट संबंधित व्यक्तीने तक्रारदाराबद्दल फेसबुक वर पोस्ट केल्या होत्या. पोलिसांनी तंबी देताच त्याने त्या सर्व पोस्ट डिलीट केल्या असे समजते. 

सोशलमिडीयाच्या अश्या पोस्टवर आळा बसायला हवा
सध्या राजुरा तालुक्यात तालुक्यातील अधिकारी, कर्मचारी व प्रतिष्ठित नागरिकांची सोशल मिडीयावर त्यांचे नाव न टाकता पोस्ट टाकण्याचे प्रमाण वाढले असून याला कुठेतरी आळा बसायला हवा, अशी मागणी आता होऊ लागली आहे. फेसबुकवर संबंधित व्यक्तींचे नाव न टाकता त्याला उद्देशून पोस्ट टाकण्याचे प्रमाण वाढले असून यावर कुठेतरी आळा बसायला हवे, असे अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी "आमचा विदर्भ" शी संवाद साधतांना सांगितले. यामुळे अनेक पत्रकारां विषयी नागरिकांच्या भावना नकारात्मक होऊ शकतात. अश्या पोस्ट सोशल मिडीयावर येत असल्यातरी बोटावर मोजण्याइतके तेच-तेच लोक त्यावर कॉमेंट आणि लाईक्स करीत असतात. यावरून हे सिद्ध होते की, तालुक्यातील सुसंस्कृत लोक अश्या पोस्टला प्रतिसाद देत नाहीत. मात्र यावर प्रतिबंध न लागल्यास भविष्यात याचे गंभीर पडसातही घटू शकतात, हे नाकारता येत नाही.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top