Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पोलिसांच्या हातात तुरी दिऊन पोलिसांचीच गाडी घेऊन पसार झाला आरोपी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पोलिसांच्या हातात तुरी दिऊन पोलिसांचीच गाडी घेऊन पसार झाला आरोपी डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी  वरोरा - वरोरा शहरापासून चार किलोमीटर...
पोलिसांच्या हातात तुरी दिऊन पोलिसांचीच गाडी घेऊन पसार झाला आरोपी
डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी 
वरोरा -
वरोरा शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या माजरा गावात एक व्यक्ती दारूच्या नशेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ माजरा गाव गाठले आणि तेथून आरोपी राकेश नामेवारला पोलिस ठाण्यात आणले. त्याच्यावर कलम १८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, लघवी करण्यासाठी बाहेर जाण्याच्या बहाण्याने आरोपी पोलिस ठाण्याच्या बाहेर आले आणि त्यांनी 112 क्रमांकाच्या उभ्या असलेल्या पोलिस वाहनात त्याने चाबी लागलेली बघितली आणि त्याने गाडी सुरु करून तिथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी आरोपीचा पाठलाग सुरू केला. तोपर्यंत आरोपी चंद्रपूर-नागपूर रस्त्यावरील येनसा गावात पोहचला होता. पोलीस आपला पाठलाग करत असल्याचे आरोपीच्या लक्षात येताच त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन दुभाजकावर जाऊन धडकले. या संदर्भात माहिती देताना उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी म्हणाले की, आरोपी पोलीस कोठडीत असून अधिक तपास सुरु आहे. मात्र, यावर बरीच चर्चा होत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top