Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: नोकारी येथील इसम नाल्याच्या पाण्यात वाहून गेला
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नोकारी येथील इसम नाल्याच्या पाण्यात वाहून गेला धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - गेल्या 2 दिवसापासून परिसरात संततधार पाऊस ...
नोकारी येथील इसम नाल्याच्या पाण्यात वाहून गेला
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
गेल्या 2 दिवसापासून परिसरात संततधार पाऊस पडत आहेत, त्या मुळे नदी नाले भरून वाहत आहेत. नौकारी (बु) येथील संजय राजाराम कंडलेवार वय 50 वर्षे हा इसम 10 जुलै ला सकाळी 9 वाजता नाल्याच्या प्रवाहात वाहून गेला. नाल्याच्या दोन्ही बाजूला अमलनाला पर्यंत गावकऱ्यांनी शोधले मात्र शोध लागला नाही. माजी उपसरपंच वामन तुराणकर यांनी प्रशासन ला घटनेची माहिती दिली, पोलीस निरीक्षक सत्यजित आमले, तहसीलदार हरीश गाडे व पटवारी वडस्कर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व शोध मोहीम सुरू केली आहे. पुलावरून पाणी वाहत असताना कुणीही पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहेत.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top