Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: भोयेगाव-धानोरा पूल आला पाण्याखाली
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
भोयेगाव-धानोरा पूल आला पाण्याखाली वर्धा नदीला पूर आल्याने या मार्गावरील वाहतूक खोळंबली  बघा व्हिडीओ धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी...
भोयेगाव-धानोरा पूल आला पाण्याखाली
वर्धा नदीला पूर आल्याने या मार्गावरील वाहतूक खोळंबली 
बघा व्हिडीओ
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
मागिल दोन तीन दिवसापासून सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्व नदी नाले भर भरून वाहू लागल्याने भोयेगाव-धानोरा रोडवरील भोयेगाव पुलावरून पाणी वाहू लागले आहे. सर्वदूर होत असलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढल्याने भोयगाव-धानोरा पूल पाण्याखाली आल्याने आज सकाळी ८.३० वाजताच्या दरम्यान या पुलावरून वाहतूक बंद झाली आहे. वाहतूक बंद झाल्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनाची मोठी रांग लागली आहे. गडचांदुर, कोरपना आवारपुर वरून भोयेगांव मार्गी चंद्रपूर घूग्गुस कडे जाणाऱ्या लोकांना दुसऱ्या पर्यायी रस्त्या शोधावा लागत आहे. मात्र सतत पाण्याची पातळी वाढत असल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांची धाकधुकी वाढली आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top