Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: प्रवाशी घेऊन जाणारा ऑटो नाल्यात गेला वाहून
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
प्रवाशी घेऊन जाणारा ऑटो नाल्यात गेला वाहून सैन्य दलाचे जवानाने वाचविले प्राण भद्रावती - तीन दिवसापासून संततधार पाऊस येत असल्यामुळे चंद्रपूर ...
प्रवाशी घेऊन जाणारा ऑटो नाल्यात गेला वाहून
सैन्य दलाचे जवानाने वाचविले प्राण
भद्रावती -
तीन दिवसापासून संततधार पाऊस येत असल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नदी नाल्या वाहत आहे. यामुळे पुलावरून पाणी वाहत असताना कोणीही वाहन टाकु नये असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले असताना भद्रावती तालुक्यातील टाकळी येथून पानवडाळा या गावाकडे पाच प्रवाशी घेऊन जाणारा ऑटो टाकळी नाल्याच्या पुलावरून टाकण्यात आला यावेळी पाण्याचा प्रवाह एकदम वाढून तो वाहुन जाऊ लागला त्या ऑटो मध्ये ५ प्रवाशी असल्याचे सांगितले जाते. त्या प्रवाशांनी वाचवा वाचवा असा आरडाओरड केला पण पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने कोणीही पाण्यात उतरून त्यांना वाचविण्यास तयार नव्हते.
अशातच त्या प्रवाशाना वाचविण्यासाठी देवदूत म्हणून सैन्य दलाचे जवान निखिल सुधाकर काळे हे आले व त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने शोध मोहीम राबवून पाचही प्रवाशांचा जीव वाचवीला. ते नुकतेच एक महिण्याची रजा घेऊन गावाला आले होते त्यांनी त्या पाच लोकांचा जीव वाचवला व त्यांना दोन्ही गावच्या व्यक्तीनी सहकार्य केले. यामुळे निखिल काळे व गावातील नागरिकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यालाच म्हणतात देव तारी त्याला कोण मारी.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top