Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: तीन वर्षीय चिमुकलीचा नालीच्या पुलात अडकून दुर्दैवी मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
तीन वर्षीय चिमुकलीचा नालीच्या पुलात अडकून दुर्दैवी मृत्यू आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स गोंडपिपरी - आई वडिलांसोबत नातेवाईकाकडे भेटी-गाठी कर...
तीन वर्षीय चिमुकलीचा नालीच्या पुलात अडकून दुर्दैवी मृत्यू
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
गोंडपिपरी -
आई वडिलांसोबत नातेवाईकाकडे भेटी-गाठी करिता आलेल्या एका तीन वर्षीय चिमुकलीचा नालीच्या पुलात अडकून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि. 10 जुलै रोज रविवारला गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथे घडली आहे. मृतक चिमुकलीचे नाव सानू मंगेश चुनारकर वय 3 वर्ष असून ही मूल तालुक्यातील चिमडा येथील रहिवाशी होती.
गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथे नातेवाइकाकडे तीन दिवसांपूर्वी आली होती. तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु असल्याने ती आई सोबत विठ्ठलवाडा येथे नातेवाइकाकडे थांबली. मुसळधार पावसाने नदी, नाले, गावातील नाली, छोटे पूल पाण्याने तुडुंब भरून वाहत आहेत अश्यातच रविवारला 9 वाजताच्या सुमारास घरासमोरील नालीत पाय घसरून पडली नाली तुडुंब भरून वाहत असल्याने पाण्याच्या प्रवाहाबरोबर नालीलगत असलेल्या पुलात जाऊन अडकली. घरच्यांनी आरडाओरड करताच तिला वाचविण्यासाठी दोन युवक नालीत उतरले आणि तिला पुलातून बाहेर काढन्याचा प्रयत्न केला. दहा ते पंधरा मिनिटचा वेळ निघून गेला मात्र ती पुलाच्या बाहेर न पडल्याने घरच्यांची धाकधूक वाढली. पुलात बाबू टाकुन पळताळणी करताच ती पाण्याच्या प्रवाहाबरोबर पूलाच्या बाहेर निघाली मात्र बराच वेळ पुलाखालील पाण्यात अडकून राहिल्याने बेशुद्ध पडली. लागलीच गावातील एका ऑटो ने तिला ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top