Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ओबीसी आरक्षणशिवाय कोणत्याही निवडणुका घेऊ नये तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द करा - डी.के. आरीकर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ओबीसी आरक्षणशिवाय कोणत्याही निवडणुका घेऊ नये तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द करा - डी.के. आरीकर   डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्...
ओबीसी आरक्षणशिवाय कोणत्याही निवडणुका घेऊ नये तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द करा - डी.के. आरीकर 
डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
राज्यात ओबीसी आरक्षणशिवाय नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद, व पंचायत समितीच्या निवडणुका घेऊन ओबीसी समाजाला निवडणुकापासून वंचित ठेऊ नये.  राज्य निवडणूक आयोगाने 17 जिल्ह्यातील 92 नगर पालिका व 4 नगर पंचायत निवडणुकीची घोषनेने ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. मात्र जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निकाल येत नाही व ओबीसी चे आरक्षण पक्के होत नाही तोपर्यत कोणत्याही निवडणुका घेण्यात येऊ नये अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल चे जिल्हा अध्यक्ष दलित मित्र व आदिवासी सेवक डी.के. आरीकर यांनी राज्याचे निवडणूक आयुक्त याना जिल्हाधिकाऱ्यां मार्फत एका शिष्टमंडळा मार्फत निवेदन देऊन केली आहे.
निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकांचा 18आगस्ट रोजी मतदान तर 19 आगस्ट रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. परंतु ओबीसी आरक्षणशिवाय निवडणुका होणे म्हणजे 52 टक्के ओबीसी समाजावर अन्याय आहे असेही आरीकर म्हणाले. 
निवेदन देते वेळी ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष डी.के. आरीकर, प्रदेश उपाध्यक्ष हिराचंद बोरकुटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हा अध्यक्ष राजू कक्कड, युवक जिल्हा अध्यक्ष नितीन भटारकर, विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, युवती शहर उपाध्यक्ष स्वाती दुर्गमवार यांची उपस्थिती होती. 


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top