Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अल्पवयीन मुलगी अल्पवयीन मुलाकडून गर्भवती
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अल्पवयीन मुलगी अल्पवयीन मुलाकडून गर्भवती  आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क चिमूर - चिमूर तालुक्यातील एका गावातील एक तेरा वर्षीय बालिका पंधरा वर्ष...
अल्पवयीन मुलगी अल्पवयीन मुलाकडून गर्भवती 
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
चिमूर -
चिमूर तालुक्यातील एका गावातील एक तेरा वर्षीय बालिका पंधरा वर्षाच्या मुलाकडून सहा महिन्याची गर्भवती असल्याची घटना नुकतीच उजेडात आली असून या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहे.
अनेक संस्था-संघटनाकडून महिलांच्या सुरक्षेसाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात तरी देखील महिला अत्याचारच्या घटना घडताना दिसतात. एका ग्रामीण भागातील एक तेरा वर्षाची मुलगी व तिच्या घराजवळ असलेला अल्पवयीन पंधरा वर्षाचा मुलगा या दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले व यातूनच त्यांचे शारेरिक संबंध निर्माण होऊन तिला गर्भधारणा झाली. याची कल्पना तिला नव्हती परंतु तीचे पोट दुखत असल्याने तिने आईला सांगितले लगेच तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे सांगितले. मात्र तिच्या आईचा यावर विश्वास बसत नव्हता म्हणून आईने त्या अल्पवयीन मुलीला विचारले असता त्या मुलाचे नावं सांगितले. मुलगा व मुलगी विधी संघर्ष बालक असल्यामुळे नावं गुप्त ठेवल्या जाते. मात्र ज्या मुलींना या वयात काही कळत नाही तीच मुलगी आता आई बनणार असल्यामुळे चिमूर तालुका हादरला आहे. या घटनेची मुलीच्या आईनी पोलिसात तक्रार दाखल केली असून आरोपी मुलाला बालसुधार गृहात पाठविण्यात आले आहे. तर मुलीला उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top