Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: जवाहर नवोदय परीक्षेत मंथन मोहूर्ले चे सुयश
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जवाहर नवोदय परीक्षेत मंथन मोहूर्ले चे सुयश भादूर्णा गावाचा पहिला नवोदय विद्यार्थी, गावात आनंदाचे वातावरण आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क सिंदेवा...
जवाहर नवोदय परीक्षेत मंथन मोहूर्ले चे सुयश
भादूर्णा गावाचा पहिला नवोदय विद्यार्थी, गावात आनंदाचे वातावरण
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
सिंदेवाही -
जवाहर नवोदय विद्यालय परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. नवोदयची परीक्षा ही परीक्षा पालक व शिक्षकांसाठी प्रतिष्ठेची परीक्षा असते या परीक्षेत सर्वोदय विद्यालय सिंदेवाहीचा विद्यार्थी मंथन अरविंद मोहूर्ले याने उत्कृष्ट यश संपादन केले असून त्याचे मूळ गाव भादूर्णा तहसील मूल येथे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 
मंथन मोहूर्ले हा भादूर्णा गावातून जवाहर नवोदय परीक्षा उत्तीर्ण करणारा पहिला विद्यार्थी ठरला आहे, मंथन हा सिंदेवाही सहकारी भात गिरणी चे व्यवस्थापक अरविंद गणपतराव मोहूर्ले यांचा मुलगा असून त्याने आपल्या यशाचे श्रेय आई, बाबा, शिक्षक आणि मित्र मंडळींना दिले आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top