Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: रुग्णालयाला लागून असलेली स्मशानभूमी इतरत्र स्थानांतरित करण्याची मागणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रुग्णालयाला लागून असलेली  स्मशानभूमी इतरत्र स्थानांतरित करण्याची मागणी नैतिक मूल्यांची जोपासना करत वृक्षाचे संवर्धन करा - प्रकाश बोरकर राजू ...
रुग्णालयाला लागून असलेली  स्मशानभूमी इतरत्र स्थानांतरित करण्याची मागणी
नैतिक मूल्यांची जोपासना करत वृक्षाचे संवर्धन करा - प्रकाश बोरकर
राजू खेडेकर मित्र-परिवारा तर्फे शासकीय रुग्णालयात वृक्षारोपण
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदुर -
नांदा येथील नवनिर्मित शासकीय रुग्णालयाचे नुकतेच उद्घाटन झाले असून या ठिकाणी विविध आजारावर उपचार आणि औषधोपचार केले जात आहे. शिवाय नवीन वास्तू असल्यामुळे संपूर्ण परिसर ओसाड स्वरूपाचा दिसून येत होता. याची दखल घेत नांदा येथील उपक्रमशील व सामाजिक उत्तरदायित्व निभावणारे युवक राजू खेडेकर व मित्रपरिवार यांनी स्वखर्चाने विविध प्रजातीचे अनेक रोपटे आणून संपूर्ण रुग्णालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बोरकर उपस्थित होते. त्यांनी, मानव जसे नैतिक मूल्यांची जोपासना करतो त्याचप्रमाणे आपण वृक्षांचे संवर्धन करायला पाहिजे असा संदेश देत पाच वृक्षांच्या संवर्धनाचं पालकत्व त्यांनी स्वीकारल. कार्यक्रमाला परिसरातील पत्रकार रत्नाकर चटप, रवी बंडीवार, प्रमोद वाघाडे, वरिष्ठ नागरिक प्रभाकर कुरसंगे, विनोद इटनकर, गौरव बंडीवार, आकाश बोंगीरवार, प्रफुल श्रीरामवार, निवासी वैद्यकीय अधिकारी विजय हिवरकर व  गावकरी उपस्थित होते. वैद्यकीय अधिकारी हिवरकर यांनी शासकीय रुग्णालयाच्या परिसरात खुली व्यायाम शाळा साहित्य उपलब्ध करून देण्याबाबत उपस्थित पत्रकारांच्या माध्यमातून मीडिया द्वारे शासनापर्यंत हाक पोचवली जावी अशी मागणी केली. तसेच रुग्णालयाला लागून असलेली स्मशानभूमी इतरत्र स्थानांतरित करण्यात यावी याविषयी स्थानिक प्रशासनाने पाठपुरावा करावा अशी मागणी केली. भविष्यात येणाऱ्या काळात नांदा ग्रामीण रुग्णालय ही फार मोठी उपलब्धी परिसरातील नागरिकांसाठी होणार आहे असे भाकीत व्यक्त केले. सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येऊन सर्वांना संवर्धनाची शपथ घेण्यात आली.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top