Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोरपन्यात आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवस साजरा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कोरपन्यात आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवस साजरा  वाढदिवसानिमित्य  तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रत...
कोरपन्यात आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवस साजरा 
वाढदिवसानिमित्य  तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना - 
आ. सुधीर मुनगंटीवार माजी वित्त, नियोजन, वन तथा पालकमंत्री, महाराष्ट्र राज्य तसेच लोक लेखासमिती अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त कोरपना तालुक्यातील कन्हाळगाव जिल्हा परिषद हायस्कूल येथे मुलांना नोटबुक व पेनचे वाटप करण्यात आले. तसेच कोरोना कळात जिवाची पर्वा न करता रुग्णसेवा देणारे डॉ. प्रमोद परचाके यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.  जयपाल राऊत मुख्याध्यापक जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव, रमेश चौधरी, स्वतंत्रकुमार शुक्ला यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 
या कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष उद्घाटक, सतीश उपलंचिवार, शहराध्यक्ष गडचांदुर, प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक जयपाल राऊत, निलेश ताजणे भाजपा नेते, पुरुषोत्तम भोंगळे भाजपा तालुका उपाध्यक्ष, अरुण मडावी माजी सरपंच, हरीभाऊ घोरे भाजपा शहर महामंत्री, प्रमोद कोडापे माजी सरपंच, सत्कार मुर्ती डॉ. प्रमोद परचाके, रमेश चौधरी, जिवतोडे व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता जिवणे सर, जुनगरी सर, मनवर, सौ. ताराबाई मेश्राम, सौ. संध्याताई गेडाम यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला विद्यार्थी, विद्यार्थीनी, नागरिक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन स्वतंत्र कुमार शुक्ला तर आभार चौधरी सर यांनी मानले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top