Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे यांचा पुढाकारातून
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे यांचा पुढाकारातून सुधीरभाऊंच्या वाढदिवसाप्रसंगी गोटूल स्थापनेसाठी आर्थिक मदत व परिसरात ...
भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे यांचा पुढाकारातून
सुधीरभाऊंच्या वाढदिवसाप्रसंगी गोटूल स्थापनेसाठी आर्थिक मदत व परिसरात वृक्षारोपण
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
आठवडी बाजार वार्डातील सार्वजनीक विहीर परिसरात आदिवासी समाजबांधवाकडून आदिवासी जमातीचे प्रतिक गोटूलचे बांधकाम करण्यात येत आहे. या गोटूल बांधकामासाठी जिल्ह्याचे लोकनेते, माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे यांच्या पुढाकारातून आर्थिक मदत करून प्रस्तावीत गोटूल परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.  
याप्रसंगी वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून उपस्थितांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांकडून समाजबांधवाकडे आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली. याप्रसंगी माजी नगरसेवक राजेंद्र डोहे, आदिवासी नेते आनंद पाटील सिडाम, शंकर कुळसंगे, बापुराव कन्नाके, आदिवासी युवा नेते रवी आत्राम, भाजपा तालुका उपाध्यक्ष सिनु पांजा, युवा नेते प्रदिप मोरे, योगेश येरणे, अक्षय तुराणकर, छबीलाल नाईक, नरेश सोयाम, मनोज कन्नाके, रवी सोयाम, लक्ष्मण कुळसंगे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
देशाच्या स्वातंत्र्यात आदिवासी समाजाचा मोठा वाटा असून वनाच्या रक्षाणासह जुन्या रूढी पंरपरा जपून ठेवण्यात हा समाज आग्रही आहे. आदिवासी बांधवांच्या हितासाठी भारतीय जनता पक्ष सदैव कटीबध्द असून त्यांना सर्वोतोपरी मदत करण्यास आम्ही तत्पर असल्याचे मत भाजयुमो जिल्हा उपध्यक्ष सचिन डोहे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता निलेश मेश्राम, उमेश आत्राम, विक्की मडावी, विशाल मडावी, करण सिडाम, विशाल टेकाम, अक्षय कुळसंगे, संतोष उईके आदींस भारतीय जनता युवा मोर्चा पदाधिकारी कार्यकर्ते तथा आदिवासी समाजातील नागरिकांनी परिश्रम घेतले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top