Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: तळागाळातील सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करणारे नेते म्हणजे सुधीर मुनगंटीवार - माजी आमदार अँड. संजय धोटे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
तळागाळातील सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करणारे नेते म्हणजे सुधीर मुनगंटीवार - माजी आमदार अँड. संजय धोटे माजी अर्थ मंत्री सुधीर मुनगंटी...
तळागाळातील सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करणारे नेते म्हणजे सुधीर मुनगंटीवार - माजी आमदार अँड. संजय धोटे
माजी अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा राजुराचे वतीने गरजू शेतकऱ्यांना शेती उपयोगी साहित्याचे वाटप
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
राजुरा -
राज्याचे माजी अर्थ मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी राजुरा व माजी आमदार अँड. संजय धोटे यांच्या पुढाकारातून अतिवृष्टी व दोनदा आलेल्या पुरामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शेती उपयोगी धान्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार सुदर्शन निमकर हेही उपस्थित होते,
यावेळी माजी आमदार संजय धोटे बोलताना म्हणाले की, सुधीर मुनगंटीवार हे महाराष्ट्र राज्याचे मंत्री असताना अनेक लोक उपगोयी निर्णय केले. त्यांच्या हातून गोर गरीब जनतेचे कामे झालीत. सर्व समाजातील न्याय देण्याचे काम सुधीरभाऊच्या माध्यमातून झाले आहे. काही दिवसात मंत्री मंडळ विस्तार होणार असून भाऊ मंत्री होऊन जनतेची सेवा करण्याकरिता प्रत्येक कार्यकर्ता प्रार्थना करीत आहे. भाऊंना वाढदिवसानिमित्त दीर्घायुष्याचा शुभेच्छा देण्यात आले. माजी आमदार सुदर्शन निमकर यांनीही शुभेच्छा दिल्या. 
याप्रसंगी माजी आमदार अँड संजय धोटे, सुदर्शन निमकर यांच्यासह माजी सभापती सुनिल उरकुडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे, जिल्हा उपाध्यक्ष विनायक देशमुख, भाजपा नेते अरुम मस्की, भाजपा जिल्हा सचिव हरिदास झाडे, भाजपा तालुका महामंत्री दिलीप वांढरे, महामंत्री प्रशांत घरोटे, माजी नगरसेवक राधेश्याम अडाणीया, श्रीमती उज्वला जयपूरकर, राजेंद्र डोहे, भाजपा ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री संदीप पारखी, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे, भाजयुमो तालुका अध्यक्ष सचिन शेंडे, भाजयुमो तालुका महामंत्री रवि बुरडकर, भाजपा नेते महादेव तपासे, मिलिंद देशकर, सरपंच चुनाळा बाळनाथ वडस्कर, भाजपा युवा नेते गणेश रेकलवार, जनार्धन निकोडे, सय्यद कुरेशी, उपसरपंच राहुल सपाट, उपसरपंच भाऊराव बोबडे, ग्रामपंचायत सदस्य मारोती चन्ने, ग्रामपंचायत सदस्य रवि गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य दिपक झाडे, श्रीनिवास पांजा, सचिन बैस, विलास खिरटकर, प्रदीप बोबडे, राहुल ढुमने, ग्रामपंचायत सदस्य नंदकिशोर कुबडे, प्रकाश आस्वले, संजय जयपूरकर, लक्ष्मण निरांजने, शहजाद अल्ली, शत्रूघन पेटकर, रामस्वामी रावला तुलाराम गेडाम, मधुकर काळे, संतोष येरने, प्रमोद ताकसांडे आदी शेतकरी, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top