Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: वीज पडून पंचायत समितीच्या माजी सदस्यांसह चार महिला ठार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वीज पडून पंचायत समितीच्या माजी सदस्यांसह चार महिला ठार वरोरा तालुक्यातील वायगाव भोयर येथील घटना सादिक थैम - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी वरो...
वीज पडून पंचायत समितीच्या माजी सदस्यांसह चार महिला ठार
वरोरा तालुक्यातील वायगाव भोयर येथील घटना
सादिक थैम - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
वरोरा -
स्थानिक शेगाव येथून जवळच असलेल्या वायगाव भोयर येथे आज चार वाजताच्या सुमारास शेतात काम करीत असलेल्या महीलावर वीज पडून मरण पावल्याची घटना घडली. सविस्तर असे की आपल्या स्वतःच्या शेतात काम करीत असताना आज दुपारच्या सुमारास चार वाजता वायगाव येथील शेत शिवारात परिसरात जोर धार मुसळधार पावसाने हजेरी लावून पाण्यासह मेघ गर्जना सह वीज गर्जना सह जोरदार हजेरी लावली यात शेतात काम करीत असताना एकाएकी मोसम बदलल्याने घराकडे निघत असताना अचानक महिलांवर विजेचा धक्का बसला असल्याने या महिलांचा जागीच मृत्यू झाला. यात  हिरावती शालिक झाडे वय ४५ वर्ष राहणार वायगाव भोयर, माजी पंचायत समिती वरोरा सदस्य, पार्वता रमेश झाडे वय ६० वर्ष राहणार वायगाव,  मधुमती सुरेश झाडे वय २० वर्ष राहणार वायगाव, रीना नामदेव गजभे वय वर्ष २० वर्ष राहणार वायगाव भोयर अशा चार महिलांचा जागीच मृत्यू झाला तर यात दोन महिला दोन मुली याचा मृत्यू झाला असल्याने गावात तसेच परिसरात शेतकरी शेतमजूर मध्ये भीती निर्माण झाले आहे. करिता या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावे अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी शेतमजुरांनी केली आहे. याची माहिती शेगाव पोलीस स्टेशन दिला असता येथील ठाणेदार अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील पंचनामा स्टेशन चे पीएसआय प्रवीण जाधव, किशोर पिरके, महादेव सरोदे कर्मचारी करीत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top