Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये मदत द्या - नाना पटोले
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये मदत द्या - नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी जाणून घेतल्या राजुरा क्षेत्रातील पुरग्रस्थांच्...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये मदत द्या - नाना पटोले
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी जाणून घेतल्या राजुरा क्षेत्रातील पुरग्रस्थांच्या व्यथा 
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क 
राजुरा -
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राजुरा विधानसभा क्षेत्रातील पूरग्रस्त भागांची पाहणी करून अतिवृष्टी व पुरपरीस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. आज दिनांक ३० जुलै रोजी सकाळी ९ वाजता शासकीय विश्रागृह राजुरा येथे त्यांचे आगमन झाले. त्यानंतर सकाळी ९.३० ते १२ वाजेपर्यंत चनाखा, पंचाळा, कोहोपरा, विहीरगाव, मुर्ती, सिंधी, नलफडी या परिसरातील पूरग्रस्त भागांची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत त्यांचे सांत्वन केले, परिसरातील शेतकरी, नागरिक यांचे पुराने मोठे नुकसान झाले असून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देवून सर्व नुकसानग्रस्तांना तातडीने सरसकट नुकसान भरपाई मिळणेसंदर्भाने कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. यानंतर सकाळी १२.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज संकुल, सुपर मार्केट हॉल राजुरा येथे काँग्रेस कार्यकर्ता बैठकीला संबोधित केले, महिनाभरापासून महाराष्ट्राचा शेतकरी असमानी - सुलतानी संकटात सापडला आहे. अतिवृष्टी व पुराने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र राज्यातील नव्या सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा अंत पाहू नका. शेतकर्‍यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्या अन्यथा शेतकऱ्यांच्या अशृंत हे सरकार वाहून गेल्या शिवाय राहणार नाही असे मत व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, कार्यकर्त्यांनी जनसेवेचे कार्य करतांनाच काँग्रेसचे ध्येय, धोरणे, विकासकामे गावागावात पोहचून पक्षाला बळकट करण्याचे आवाहन केले. या प्रसंगी गडचांदूर नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा शिवसेनेचे नेते सचिन भोयर यांना प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या हस्ते काँग्रेस पक्षात प्रवेश देण्यात आला. या नंतर आमदार सुभाष धोटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला. 
या प्रसंगी खासदार बाळु धानोरकर, आमदार अभिजित वंजारी, आमदार सुभाष धोटे, माजी आमदार अविनाश वारजुरकर, काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, महिला जिल्हाध्यक्षा नम्रता ठेमस्कर, गडचिरोली जिल्हाध्यक्ष ब्राम्हणवाडे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे, माजी जिल्हाध्यक्ष विनोद दत्तात्रय, राजा तिडके, विजयराव नाले, डॉ. नामदेवराव किरसान, चंद्रपूर कृ.उ.बा. समितीचे सभापती दिनेश चोखारे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, विठ्ठल थीपे, तुकाराम झाडे, गणपत आडे यासह राजुरा विधानसभा क्षेत्रातील चारही तालुक्यातील काँग्रेसच्या विविध शाखेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि काँग्रेसप्रेमी नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. संचालन व आभार प्रा. आशिष देरकर यांनी केले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top