गावागावात ऑनलाईन अर्ज भरण्याचा उपक्रम
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
राजुरा -
राजुरा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या एक व दोन वर्षीय विविध अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरणे सुरू आहेत. राजुरा येथे 13 विविध अभ्यासक्रम सुरू असून यासाठी राजरा येथील संस्थेत तसेच तालुक्यातील विविध गावात जाऊन संस्थेचे कर्मचारी ऑनलाइन अर्ज भरून घेत आहेत. या सुविधांचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी शासनाच्या या शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राजुरा आयटीआयचे प्राचार्य वैभव बोनगिरवार यांनी केले आहे. राजुरा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था ही कनिष्ठ वर्ग एक श्रेणीत असून येथे कातारी, यंत्र कारागीर, यांत्रिक इलेक्ट्रॉनिक्स, यांत्रिक मोटारगाडी, वीजतंत्री, तारतंत्री, जोडारी व माहिती तंत्रज्ञान व तांत्रिक प्रणाली दुरुस्ती हे दोन वर्षे कालावधीचे एकूण आठ अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. एक वर्षीय अभ्यासक्रमात संधाता, यांत्रिक ऑटो इलेक्ट्रकल, यांत्रिक डिझेल, फॅशन टेक्नॉलॉजी आणि शिवण व कर्तन या पाच अभ्यासक्रमांचा समावेश आहे. याशिवाय एलईडी पथदिवे दुरुस्ती, डाटा एंट्री ऑपरेटर, ड्रेस मेकिंग, गारमेंट्स मॅनुफॅक्चरींग, ऑटोमोबाइल
इंजिनीअरिंग टेक्नॉलॉजी, इलेकट्रिक टेक्नॉलॉजी यासारखे महत्वाचे अभ्यासक्रम राजुरा येथे सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या अभ्यासक्रमासाठी इयत्ता दहावी पास ही पात्रता असून दहावी नापाससाठीही काही अभ्यासक्रम आहेत. राजुरा येथे सुसज्ज व प्रशस्त अशी आयटीआय इमारत असून
मॅनुफॅक्चरींग, ऑटोमोबाइल इंजिनीअरिंग टेक्नॉलॉजी, इलेकट्रिक टेक्नॉलॉजी यासारखे महत्वाचे अभ्यासक्रम राजुरा येथे सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या अभ्यासक्रमासाठी इयत्ता दहावी पास ही पात्रता असून दहावी नापाससाठीही काही अभ्यासक्रम आहेत. राजुरा येथे सुसज्ज व प्रशस्त अशी आयटीआय इमारत असून प्रात्यक्षिकासाठी भरपूर साधन सामुग्री आहे. म्हणुन या अभ्यासक्रमाचे युनिट वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. या संस्थेत 600 विद्यार्थी प्रशिक्षणार्थीची क्षमता असून 46 निदेशक व अन्य कर्मचारी यांचा चांगला प्रशिक्षित स्टाफ येथे आहे. ऑनलाइन अर्ज भरल्यावर जिल्ह्यातील
सर्व आयटीआयतील अभ्यासक्रमात पसंतीनुसार हा अर्ज ग्राह्य धरला जाणार आहे. या संस्थेत 75 टक्के जागा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असून या एसटी विद्यार्थ्यांना पाचशे रुपये प्रतीमहिना मानधन देण्याची तरतूद आहे. विद्यार्थ्यांनी शासनाच्या या शिल्प कारागीर प्रशिक्षण केंद्राच्या लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य वैभव एम. बोनगिरवार यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.