Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अंचलेश्वर गेट बस सुरू करण्याची मागणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अंचलेश्वर गेट बस सुरू करण्याची मागणी एच.एन. (राजेश) अरोरा - आमचा विदर्भ प्रतिनिधी बल्लारपुर - बल्लारपूर ते चंद्रपुरातील अंचलेश्वर गेट ही बस ...
अंचलेश्वर गेट बस सुरू करण्याची मागणी
एच.एन. (राजेश) अरोरा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
बल्लारपुर -
बल्लारपूर ते चंद्रपुरातील अंचलेश्वर गेट ही बस अनेक शहर भागात वर्षांपासून सुरू होती. सामान्य प्रवासी आणि विशेषतः विद्यार्थ्यांच्या सोयीची ही बस कोरोनाकाळात बंद करण्यात आली. कोरोना गेल्यानंतर मधला काही काळ वगळता ती अजूनही बंद आहे. यामुळे चंद्रपूर शहर बल्लारपूरहून जाणाऱ्या विद्यार्थी तसेच इतर प्रवाशांना बायपासने धावणाऱ्या बसेसने ये-जा करावे लागत आहे. यात प्रवासी तथा विद्यार्थ्यांचा वेळ वाया जात आहेच. सोबतच आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे. ही अडचण दूर व्हावी, याकरिता विद्यार्थ्यांना सोयीची असलेली ही लोकल बससेवा परत सुरू करण्यात यावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top