Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: दुचाकी चोराला देवईत केली अटक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
दुचाकी चोराला देवईत केली अटक सात मोटारसायकली जप्त राजुरा पोलिसांची कारवाई आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क राजुरा - मागील काही दिवसांपासून दुचाकी...
दुचाकी चोराला देवईत केली अटक
सात मोटारसायकली जप्त
राजुरा पोलिसांची कारवाई
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
राजुरा -
मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या अनेक घटना राजुरा तालुक्यात घडल्या होत्या. विशेषतः येथील शनिवारला भरणाऱ्या आठवडी बाजारातून मोटार सायकल चोरीला गेल्या होत्या. याविषयी दखल घेत राजुरा पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथक सतत या प्रकरणाचा गंभीरपणे तपास करीत होते. यात त्यांना यश मिळाले असून या प्रकरणातील आरोपी सात मोटारसायकलसह अटक केली आहे. राजुरा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोंभूर्णा तालुक्यातील देवई गावातील पंकज भाऊजी टेकाम, (39) याला 2 लाख 30 हजार रुपये किमतीच्या सात दुचाकीसह ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास राजुरा पोलिस करीत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक यांच्या आदेशान्वये उपविभागीय पोलिस अधिकारी राजा पवार, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर बहाद्दुरे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे हवालदार खुशाल टेकाम, रवींद्र नक्कनवार, किशोर तुमराम, शिपाई महेश बालगोडवार, योगेश पिदूरकर, रामराव बिंगेवाड यांनी केली.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top