Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: पूरग्रस्तांना मिळणार मदतीचा हात - डॉ.मंगेश गुलवाडे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पूरग्रस्तांना मिळणार मदतीचा हात - डॉ.मंगेश गुलवाडे भाजपा पदाधिकऱ्यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपू...
पूरग्रस्तांना मिळणार मदतीचा हात - डॉ.मंगेश गुलवाडे
भाजपा पदाधिकऱ्यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
भारतीय जनता पार्टी सदैव जनतेच्या पाठीशी आहे.कोरोनाच्या संकटात भाजपाने जनतेला मदतीचा हात दिला. लोकनेते आ सुधीर मुनगंटीवार यांनी मागेल त्याला मदत दिली. ही भूमिका अजूनही कायम असून ज्यांना मदतीची गरज आहे, अश्या पूरग्रस्तांना मदतीचा हात महानगर भाजपा तर्फे दिला जाईल, असे आश्वासन भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांनी पूरग्रस्तांना पाहणी दरम्यान दिले.
मागील 10 दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. यातच सर्व धरणं 100 टक्के भरल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. याचा फटका चंद्रपूर महानगराला बसला असून प्रामुख्याने महानगरातील विठोबा खिडकी, विठ्ठल मंदिर परिसर, पाठाणपुरा गेट, राहमत नगर, नगिनाबाग, अग्रसेन भवन मागील परिसर, राष्ट्रवादी नगर इ. भागात पुराचे पाणी घरात शिरल्याने किमान एक हजार नागरिकांना घर सोडून इतरत्र सुरक्षित स्थळी स्थानांतरित व्हावे लागले आहे.काहींना महात्मा फुले शाळा येथे आश्रय देण्यात आला आहे. या भागाची गुरुवार (14 जुलै) ला महानगर भाजपाच्या पदाधिकारींनी पाहणी केली. यात प्रामुख्याने माजी महापौर राखीताई कंचर्लावार, भाजपा कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, माजी स्थायी समिती सभापती संदीप आवारी, महासचिव सुभाष कासनगोट्टूवार, माजी नगरसेवक संजय कंचर्लावार, डॉ किरण देशपांडे, सचिन कोतपल्लीवार, विशाल निंबाळकर, चांदभाई पाशा, विनोद शेरकी, सूर्यकांत कुचनवार, गणेश रामगुंडवार, रवी लोणकर, रितेश वर्मा यांची उपस्थिती होती.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top